॥ अमृतबोध ॥
१ जून २०१७
॥ हरिपाठ मंजिरी - १६५ ॥
महात्म्यांचे अप्रतिम वर्णन करताना सद्गुरु श्री माउली म्हणतात, "ते सूर्यासारखे तेजस्वी असतात; पण त्याच्याप्रमाणे अस्त पावत नाहीत. चंद्राप्रमाणे ते संपूर्ण आल्हाददायक असतात; परंतु कलांचे न्यूनाधिक्य त्यांच्या ठिकाणी नसते. मेघांप्रमाणे ते उदार असतात; पण ओसरत मात्र नाहीत. सिंहाप्रमाणे ते निर्भय असूनही सदय असतात !"
सूर्य तेजस्वी असतो पण तो रोज संध्याकाळी मावळतो. मात्र महात्मे सदैव तेजस्वीच असतात, त्यांचे तेज कोणत्याही परिस्थितीत कमी होत नाही. चंद्र शीतल असतो, आल्हाददायक असतो, पण तो कलेकलेने रोज कमी होत जाऊन अमावास्येला पूर्ण लोप पावतो. महात्मे देखील चंद्राप्रमाणे संपूर्ण आल्हाददायक असतातच, शिवाय त्यांना कलांचा कमीजास्तपणा नसतो. ते सर्व कलांनी सतत परिपूर्णच असतात.
मेघ अतिशय उदार असतात, आपले सर्वस्व ते देऊन टाकतात, पण त्यानंतर मात्र ते ओसरतात, त्यांच्यापाशी काहीच शिल्लक राहात नाही. महात्म्यांचे उदारपण मात्र चिरंतन असते. त्यांनी कितीही दिले तरी त्यांचे पूर्णत्व सदैव अबाधितच असते. सिंह हा मृगेंद्र म्हणजे सर्व प्राण्यांचा राजा असल्याने तो निर्भय असतो, पण क्रूरता हा त्याचा स्थायीभाव होय. महात्मे देखील सिंहासमान निर्भय असतात, पण त्याचवेळी ते दयेनेही परिपूर्ण असतात. त्यांच्याठायीचा निरपेक्ष दयेचा, कृपेचा झरा निरंतर वाहातच असतो. सद्गुरु श्री माउली येथे महात्म्यांचे सर्वलोकविलक्षण असे सद्गुणैश्वर्य कथन करीत आहेत.
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:
Post a Comment