सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज हरिपाठाच्या नवव्या अभंगात दुर्दैवी अभक्तांविषयी खेद व्यक्त करतात.
या अभंगाचा सरलार्थ सांगताना प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात, "कितीही ज्ञानी असला तरी, महाविष्णू श्रीहरींच्या रामकृष्णादी सगुण अवतारांच्या लीला गाण्यात आणि त्यांचे नामस्मरण करण्यात ज्यांचे मन रंगले नाही, त्यांचे ते सर्व ज्ञान व्यर्थ आहे. सगुण उपासनेेने अद्वैत-ज्ञानसिद्धी करून घेण्याचा हा मार्ग ज्याला पटला नाही, तो जन्माला येऊन कमनशिबाचाच म्हटला पाहिजे. कारण अशाने त्याला भगवत्प्राप्ती कशी होणार?"
ज्याला हरिभक्तीची ओढ नाही, तो कितीही मोठा ज्ञानी असला तरी त्याचे ते ज्ञान शाश्वत आनंदासाठी काहीही फायद्याचे ठरत नाही. म्हणूनच ते सर्व ज्ञान व्यर्थच म्हटले पाहिजे. सगुण श्रीहरींच्या लीला गाणे व त्यांचे नामस्मरण करणे, हे अद्वैतज्ञान प्राप्त होण्याचे मार्ग आहेत. हेच त्या दुर्दैवी जीवाला पटत नाहीत, म्हणून एकप्रकारे तो कमनशिबीच ठरतो. कारण एवढा दुर्लभ असा नरजन्मच तो व्यर्थ गमावतो.
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:
Post a Comment