17 June 2017

*॥ अमृतबोध ॥* *१७ जून २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १८१ ॥*

प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज भक्तराज प्रल्हादांची गोष्ट पुढे सांगतात की, कयाधु ही हिरण्यकश्यपूची नावडती राणी असल्याने ती अरण्यात वास करून होती. त्यावेळी तिने प्रभूंचा धावा केला. तेव्हा देवर्षी नारदमुनींनी येऊन तिला शक्तियुक्त नाम दिले व ज्ञान सांगितले. ते सर्व गर्भात असलेल्या प्रल्हादाने ऐकले व तो जन्मत:च अमर झाला.
मोठा झाल्यावर प्रल्हाद आपले ऐकत नाही, सतत आपल्या शत्रूचे म्हणजेच भगवान श्रीनारायणांचेच
स्मरण करतो, म्हणून त्याच्या बापाने त्याला विष दिले, कड्यावरून लोटले, समुद्रात बुडवले, व्याघ्राच्या तोंडी दिले, मारेकरी घातले. इतके प्रयत्न केले तरी प्रल्हाद काही मरेना.
तेव्हा हिरण्यकश्यपूने विचारले, तुला कोणी वाचवले? त्यावर प्रल्हाद म्हणाला की, माझ्या नारायणाने वाचवले. हा नारायण कोठे राहतो? प्रल्हाद म्हणाला, तो सर्वत्र, जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी राहतो. हिरण्यकश्यपूने चिडून विचारले, या खांबात राहतो का? प्रल्हाद म्हणाला, हो, राहतो.
हे ऐकताच चवताळलेल्या दैत्याने खांबावर धावून जाऊन लाथ मारली. इकडे प्रल्हाद आपला शांतपणे 'नारायण नारायण' जप करीत होताच. खांबावर लाथ मारताच त्यातून सत्वर नृसिंहरूप घेऊन नारायण आले व त्यांनी दैत्यास ठार केले.
या सगळ्यात *'सत्वर उच्चार' याचा अर्थ, घाईने नाम घेणे असा नसून, "अखंड नाम जो शांत चित्ताने घेतो त्याच्या कार्यासाठी देव सत्वर धाव घेतात'*, असाच आहे. हेच सद्गुरु श्री माउली *"सत्वर उच्चार प्रल्हादीं बिंबला ।(हरि.८.५)"* या चरणातून स्पष्ट सांगतात.
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:

Post a Comment

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Blog Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates