देह हे माध्यम आहे खरेतर परमार्थाचे. पण लोक त्याचा परमार्थ सोडून सर्व गोष्टींसाठी सतत उपयोग करतात आणि शेवटी त्याच मायेत गुरफटून नाश पावतात. संतांना लोकांच्या या उफराट्या वागणुकीचे फार दु:ख होत असते. म्हणून अतीव कळकळीने ते उपदेश करून लोकांना सन्मार्गाला लावतात.
याच तळमळीने अत्यंत मोलाचा उपदेश करताना प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात, " घोडे कितीही चांगले असले तरी ते पागेतच बांधतात; स्वयंपाकघरात आणून बांधत नाहीत. तद्वतच देहाचे कौतुक प्रपंचापुरतेच मर्यादित ठेवावे. परमार्थ साधून घेण्याइतपतच त्याचा उपयोग ठेवावा."
ज्याची जेवढी गरज तेवढेच त्याचे महत्त्व मानावे, हेच प. पू. श्री. मामा यातून आपल्याला समजावत आहेत. देहाला कवटाळून बसले तर त्याच्यासारखे आपणही नाशिवंतच ठरू. म्हणून परमार्थाचे साधन मानून या देहाचे आवश्यक तेवढेच कौतुक करावे, त्याला नीट सांभाळून राखावे व त्यातूनही आपला परमार्थच साधावा, हीच साधक म्हणून आपण सतत काळजी घ्यायला हवी !!
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
8 November 2016
॥ अमृतबोध ॥ ८ नोव्हेंबर २०१६
7 November 2016
॥ अमृतबोध ॥ ७ नोव्हेंबर २०१६
एखादी गोष्ट सतत उगाळत बसणे, हा मनुष्यस्वभावच आहे. त्यामुळे प्रत्येकजण काही ना काही उगाळत बसतोच. कोणी सुख उगाळते तर कोणी दु:ख. कोणी स्वत:ची भलावण करते तर कोणी बायकोचे कौतुक उगाळते. कोणी सारखे काहीतरी रडगाणेच गात बसते. एकूण काय, निरर्थक काहीतरी उगाळल्याशिवाय माणूस जगूच शकत नाही.
आता या दुर्गुणाचा नेहमी तोटाच सहन करण्यापेक्षा त्याचा काही फायदा झाला तर तेवढाच लाभ होईल ना! याच भूमिकेतून प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज उपदेश करतात की, " एखादी गोष्ट उगाळत बसणे हा मनुष्यस्वभावच आहे. पण घडून गेलेल्या अशा निरर्थक गोष्टी उगाळण्यापेक्षा, ' मी ब्रह्मस्वरूपच आहे ' हे उगाळणे बरे ! "
जुन्या, होऊन गेलेल्या गोष्टी आता उगाळण्यात काय हशील? त्याचा फायदा काहीच नाही पण तोटेच फार. वेळेपरी वेळ वाया जातो, असलेली मनाची शांती तर ढळतेच शिवाय नसत्या चिंता वाढतात. त्यापेक्षा ' मी ब्रह्मस्वरूपच आहे ', ह्याचे सतत चिंतन केल्याने एखाद्या पावन दिवशी श्रीगुरुकृपेने खरोखर तो अनुभवच आपल्याला येईल !
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
6 November 2016
॥ अमृतबोध ॥ ६ नोव्हेंबर २०१६
नागाने नखाच्या टोकाला दंश केला तरी त्याचे विष क्षणार्धात संपूर्ण शरीरभर पसरते. " नखाग्री व्याळ लागे । तो शिखांत व्यापी वेगे ।" असे श्री माउली देखील म्हणतात. गंमत म्हणजे या नाग-विषाच्या प्रभावाने मिरची देखील गोड लागते.
या नागासारखेच श्रीसद्गुरूंचे कार्य असते. ते आपले ' शक्तियुक्त नाम ' रूपी अमृत, अनुग्रहाद्वारे साधकाच्या शरीरात कृपापूर्वक भिनवतात. फक्त फरक एवढाच आहे की, नाग घातक विष भिनवतो, तर श्रीसद्गुरु दंश करून म्हणजेच अनुग्रह करून अमर करणारे अलौकिक अमृत भिनवतात.
तो साधक जसजसा श्रीसद्गुरूंनी सांगितलेले साधन प्रेमाने व नेमाने करू लागतो, तसतसे ते अमृत त्याच्या सर्वांगात भिनते, त्याचे अंत:करणही व्यापून घेते. त्या कृपारूप अमृताच्या अद्भुत प्रभावाने तो साधकही मग त्यांच्याचसारखा, अंतर्बाह्य अमृतमयच होऊन ठाकतो !!
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
5 November 2016
॥ अमृतबोध ॥ ५ नोव्हेंबर २०१६
सर्व शास्त्रे, सर्व संत एकमुखाने सांगतात की, श्रीगुरु हे साक्षात् श्रीभगवंतांचेच स्वरूप असतात. ते मनुष्यरूप दिसले तरी अंतर्बाह्य सच्चिदानंदस्वरूपच असतात. भगवान श्री माउली देखील म्हणतात, " येर माणूसपण हे भांब । लौकिक भाग ॥ " आपल्या पांचभौतिक दृष्टीला तसेच पाहायची सवय असते, म्हणूनच श्रीगुरु आपल्याला मनुष्य वाटतात. पण हा भाव साधनेत फार घातक असतो.
यासाठीच साधकांना व पारमार्थिकांना यथार्थ मार्गदर्शन करताना प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात, " तीर्थाला सामान्य जल समजणा-याला, मूर्तीला दगड म्हणणा-याला आणि श्रीगुरूंना मनुष्य मानणा-याला शास्त्रांनी पापी व महामूर्ख म्हटलेले आहे. "
श्रीभगवंतांच्या विग्रहाच्या अभिषेकाचे जल हे सामान्य जलच दिसत असले, तरी त्यात प्रचंड सामर्थ्य असते. मूर्ती दगडाची जरी असली, निर्जीव वाटत असली तरी त्यातील देवत्वामुळे ती चिन्मयच मानली पाहिजे. हेच श्रीगुरूंच्याही बाबतीत सत्य असते. ते प्रत्यक्ष शक्तिस्वरूप असतात, चालते बोलते परब्रह्मच असतात. म्हणून या तिन्हींना सामान्य समजणा-या माणसाला शास्त्रे महामूर्ख व पापीच म्हणतात. श्रीसद्गुरूंना मनुष्यरूपात पाहणे, हा शिष्यासाठी महादोषच सांगितलेला आहे. अशी चूक आपल्याकडून कदापि होऊ नये, म्हणूनच प. पू. श्री. मामा येथे आपल्या डोळ्यांत अपूर्व श्रीगुरुप्रेमाचे अमृतमय बोधांजनच घालत आहेत !!
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
4 November 2016
॥ अमृतबोध ॥ ४ नोव्हेंबर २०१६
भगवान श्री माउली म्हणतात की, " जीवाची कर्मसाम्यदशा आली की श्रीसद्गुरूंची आपोआप भेट होऊन त्याच्यावर कृपा होते. " हा ' कर्मसाम्य ' शब्द विशेष अर्थपूर्ण असून माउलींचीच स्वतंत्र निर्मिती आहे.
कर्मसाम्य शब्दाचा ब-याचवेळा लोक, पाप-पुण्याची समानता असा अर्थ करतात, तो बरोबर नाही. या माउलींच्या शब्दाचे नेमके रहस्य प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज सांगतात की, " प्रपंचाच्या कर्मांचा जोर संपून परमार्थाच्या पुण्यकर्मांचा जोर वाढणे यालाच ' कर्मसाम्यदशा ' म्हटले जाते. "
या जगात प्रत्येक गोष्ट कर्मांवरच अवलंबून अाहे. प्रपंच करण्याची वृत्ती असो किंवा परमार्थ करण्याची; दोन्ही पूर्वकर्मांवरच अवलंबून असतात. म्हणून प्रपंच करण्याची म्हणजेच पुन्हा या मायेत गुंतण्याचीच प्रवृत्ती देणा-या कर्मांचा जोर कमी होऊन; आपण परमार्थ करावा, संतांच्या, सज्जनांच्या संगतीत राहावे, श्रीभगवंतांचे नाम घ्यावे, दर्शन घ्यावे, सेवा करावी; अशा प्रकारच्या वृत्तींचे तरंग वारंवार मनात उठू लागतात. त्यानुसार मग खरोखरीच तशी पुण्यकर्मे आपल्या हातून निरपेक्षपणे होऊ लागतात. कधी एकदा त्या दयाघन श्रीगुरूंची भेट होते आणि मी त्यांच्या सर्वार्थदायक श्रीचरणीं कडकडून मिठी घालतोय, अशी चित्ताची व्याकुळता आपोअापच होऊ लागते; नकळतच डोळे भरून येतात व श्रीभगवंतांविषयी अनावर प्रेम हृदयात दाटून येते. पूर्वी हिरिरीने करत होतो त्या रोजच्या व्यवहारात आता रस न राहिल्याने मनाची चलबिचल होऊ लागते व नाम घेतल्याने, संतांचे ग्रंथ वाचल्याने मात्र ते शांत होते. अशा प्रकारची परमार्थाला अनुकूल ठरणारी अंत:करणाची स्थिती म्हणजेच कर्मसाम्यदशा होय. ही दशा आल्याशिवाय श्रीगुरूंची कृपा लाभत नाही व त्यामुळे खरा परमार्थही सुरू होत नाही. ही कर्मसाम्यतेची स्थिती आली तरीही पुढे कृपा होण्यासाठी शुद्धपुण्याची नितांत आवश्यकता असतेच व ते शुद्धपुण्य सतत वाढवणे, हेच त्यावेळी आपले प्रधान कर्तव्यही ठरते !!
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
3 November 2016
॥ अमृतबोध ॥ ३ नोव्हेंबर २०१६
श्रीगुरूंच्या कृपानुग्रहाशिवाय कधीच सत्य परमार्थ सुरू होत नसतो. पण म्हणून गुरु गुरु करत फिरायचीही गरज नसते. आपण जी काय उपासना करतो तीच प्रेमाने व नेमाने होत राहिली की, पुण्यसंचय होऊन योग्यवेळी आपोआप आपल्या श्रीगुरूंची भेट होऊन त्यांची कृपा होत असते. भगवान श्री माउली " श्रीगुरु आपैसा भेटेचि गा ।" म्हणतात ते याच अर्थाने. ' आपैसा भेटे ' चा अर्थ अनेक वेळा लोक असा करतात की, गुरु शिष्याला शोधत येतात. हे मात्र पूर्ण चूक आहे. नियोजित श्रीगुरूंची व शिष्याची भेट प्रयत्न न करता आपोआपच होते; एवढाच त्याचा अर्थ आहे. शिष्य शोधणारे गुरु खरे गुरूच नव्हेत.
या संदर्भात शास्त्रशुद्ध व अचूक मार्गदर्शन करताना प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात, " श्रीगुरूंची, मोक्षगुरूंची योजना ईश्वरानेच केलेली असते. गुरु-शिष्य संबंध अनेक जन्मांचे असतात. नियोजित श्रीगुरूच योग्य वेळी शिष्याला भेटून कृतार्थ करतात. "
आपली व आपल्या श्रीगुरूंची भेट होणे ही ईश्वरेच्छाच असते व ते सर्व पूर्वनियोजित असते. त्या भेटीसाठीचे पुण्य आपल्या गाठीशी जमा झाले की बरोबर गुरुभेट होते. गुरु-शिष्यांचे जन्मजन्मांचे ऋणानुबंध असतात. ते बंध जाणूनच श्रीगुरु अनुग्रह करतात. सर्व संतांच्या चरित्रांमध्ये या ऋणानुबंधांच्या हकीकती वाचायला मिळतात. शिष्याची कर्मसाम्यदशा आली की बरोबर श्रीगुरूंची भेट होऊन कृपालाभ होतोच व त्यानंतरच खरा परमार्थ सुरू होत असतो.
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
2 November 2016
॥ अमृतबोध ॥ २ नोव्हेंबर २०१६
संतांचे सांगणे हे अगदी नेमके व चपखल असते. कारण ते स्वत:चा अनुभवच प्रत्येकवेळी सांगत असतात. म्हणूनच त्यांचे सांगणे व इकडचे तिकडचे वाचून पोपटपंची करणा-या इतर लेखक-वक्त्यांचे सांगणे यात जमीन-आस्मानाचा फरक असतो.
प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांचे असे नेमके सांगण्याची हातोटी फार वैशिष्ट्यपूर्ण अाहे. श्रीसद्गुरूंविषयी सांगताना ते म्हणतात की, " सर्वच संत सद्गुरुस्वरूप असतात. पण ज्याप्रमाणे सर्वच स्त्रिया मातेसमान असूनही जन्मदात्री एकच असते; तसेच मोक्षप्राप्ती करवून देणारे सद्गुरूही एकच असतात. "
शिष्याच्या हृदयात सर्व संतांविषयी सद्गुरुभावना असली पाहिजे, पण ते आपल्याच सद्गुरूंचे स्वरूप आहेत अशी. आपले सद्गुरु हे आपले सर्वस्वच झाले पाहिजेत. लहान बाळाला भूक लागली तर समोर कितीही आया असल्या तरी जसे त्याची भूक फक्त त्याचीच जन्मदात्री भागवू शकते; तसेच परमार्थातही होते. सर्वच संत मोठे असले तरी मोक्ष केवळ आपल्याच श्रीसद्गुरूंच्या कृपेने लाभतो !
प. पू. श्री. मामा येथे सद्गुरूंप्रति असाव्या लागणा-या शिष्याच्या दृढ शरणागतीचाच पुरस्कार करून, आपल्या हृदयात तो बोध पक्का ठसवत आहेत. ही अनन्य शरणागतीच शिष्याला परमार्थातील सर्वोच्च अनुभूती मिळवून देत असते.
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
Total Pageviews
Translate
Followers
Popular Posts
-
शुभ दीपावली !! श्रीसंत तुकाराम महाराज म्हणतात, " जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी । तेणे पथ्ये सांभाळावी ॥ " या 'विठ्ठल मात्रे...
-
॥ अमृतबोध ॥ संतांचे ' सांगणे ' फार मार्मिक असते. परिस्थितीचा पुरेपूर अंदाज त्यांच्या क्रांतदर्शी विचारांनी आधीच घेतलेला असतो. ...
-
नमस्कार मित्रहो, संतांची वचने ही दीपस्तंभासारखी असतात. महासागरात वाट चुकून भलतीकडे जाणा-या जहाजांना योग्य दिशा व योग्य मार्गावर ठेवण्य...
-
( श्रीदत्तसंप्रदायाचे अध्वर्यू योगिराज सद्गुरु श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांच्या २६ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त विशेष लेखमाला...
-
( श्रीदत्तसंप्रदायाचे अध्वर्यू योगिराज सद्गुरु श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांच्या २६ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त विशेष लेखमाला. ...
-
प. पू . सद्गुरु श्री. मामासाहेब देशपांडे महाराज यांच्या पुस्तकांसाठी - श्रीवामनराज प्रकाशन पुणे . ' श्रीगुरुकृपा ' , श्रीसंत ...
-
॥ अमृतबोध ॥ योगिराज सद्गुरु श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांच्या नित्य-चिंतनीय अशा ' अमृतबोध ' ग्रंथामधील प्रस्तुत उपदेश-वचन...