१२ जुलै २०१६
संत कोणाला म्हणावे? याच्या अनेक व्याख्या संतांनीच करून ठेवलेल्या आहेत. त्यांपैकी ख-या संतांचे एक सुंदर लक्षण प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज येथे सांगत आहेत. संतांचा हात हा कायम काहीतरी देण्यासाठीच पुढे येत असतो, काही मागण्यासाठी नाही. जे सतत काहीतरी मागतात किंवा ज्यांना इतरांकडून काहीतरी हवे असते, ते संत नव्हेत, ते तर भिकारी.
भगवान श्रीमाउली देखील म्हणतात की, संतांचा हात हा समोरच्याला अभय देण्यासाठी नाहीतर आशीर्वाद देण्यासाठीच उचलला जातो. किंवा पडलेल्याला उठवण्यासाठी पुढे येतो. त्यांच्या निर्व्यापार हातांना याशिवाय अन्य प्रकार माहीतच नसतात. हीच गोष्ट प. पू. श्री. मामा संतांचे व्यवच्छेदक लक्षण म्हणून सांगत आहेत.
( कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:
Post a Comment