२४ जुलै २०१६
आपले मन हे महासामर्थ्यशाली, ताकदवान असते. जणू एखादा मत्त हत्तीच. पण हत्ती जसा माहूताच्या हातातील छोट्या अंकुशाला घाबरून सांगू तसा वागतो, तसेच हे मनही केवळ एकाच अंकुशाला घाबरते. तो अंकुश म्हणजेच श्रीसद्गुरूंनी कृपावंत होऊन दिलेले सिद्धनाम होय. म्हणून प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज आपल्याला सांगतात की, ज्याला स्वत:चे कल्याण साधून घ्यायचे आहे, त्याने श्रीसद्गुरूंना शरण जाऊन त्यांच्याकडून नामरूपी अंकुश प्राप्त करावा म्हणजे हे मोठे कार्यक्षम मनही सहजपणे ताब्यात ठेवता येते व त्यामुळे आपले कल्याण होते.
मनाला प. पू. मामा हत्तीची चपखल उपमा देत आहेत. कारण हत्ती अतिशय बुद्धिमान, ताकदवान तर असतोच; पण तो नीट शिकवले तर आपल्या प्रचंड उपयोगी पडतो. त्याला प्रेमाने शिकवणे कठीणही नसते. तेच जर तो पिसाळला तर होत्याचे नव्हतेही करतो. ही सर्व लक्षणे मनाच्याही ठिकाणी देखील अगदी अशीच दिसून येतात. म्हणून ही उपमा देण्यात पू. मामांचे उत्तम निरीक्षण व सूचकता नेमकी जाणवते.
( कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:
Post a Comment