३० जुलै २०१६
आत्मपरीक्षण करणे, हा आपल्यात सुधारणा करण्याचा सर्वात महत्त्वाचा मार्ग आहे. पण ते कसे करायचे? हेच माहीत नसल्याने गोंधळ होतो. म्हणूनच प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज आत्मपरीक्षणाची सुयोग्य पद्धत सांगताना म्हणतात की, पहिल्यांदा आपल्या मनातील सद्विचारांचा पाठपुरावा करायला शिकावे. ते विचार तातडीने अंमलात आणावेत. आपली चूक कोणी लक्षात आणून दिली तर ती लगेच कबूल करावी व त्या चुकांची दुरुस्ती करण्यात आपला अहंकार अजिबात आड येऊ देऊ नये. या तीन गोष्टी साधल्या तरच खरे आत्मपरीक्षण होऊन आपल्या स्वभावात, वागण्यात व विचारांमधे सकारात्मक बदल घडून आपले जीवन अधिक सुखकर होते. सर्वसामान्यांबरोबरच साधकांसाठी तर आत्मपरीक्षण ही विशेष आवश्यक गोष्ट आहे.
( कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
( कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
0 comments:
Post a Comment