१९ जुलै २०१६
श्रीगुरुपौर्णिमा
श्रीसद्गुरुचरणांना सादर वंदन ! आज श्रीगुरुपौर्णिमेच्या पावन पर्वावर, श्रीगुरु भगवंतांचे अलौकिक माहात्म्य गायन करणे हे आपले सर्वांचे प्रधान कर्तव्य आहे. यासाठीच प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज येथे श्रीगुरूंच्या अवताराचे मुख्य मर्म सांगतात की, अज्ञानामुळे जीव स्वत:ला शिवांपासून वेगळा समजतो. ते मायाजनित अज्ञान नष्ट करण्याचे शस्त्र केवळ आणि केवळ श्रीसद्गुरूच देऊ शकतात, तो भगवंतांचाही अधिकार नाही. त्यांना जीवावर अनुग्रह करायचा झाला तरी त्यासाठी त्यांना गुरुरूपानेच प्रकट व्हावे लागते. म्हणून श्रीगुरु हे भगवंतांपेक्षाही श्रेष्ठ आहेत. त्यांच्याशिवाय मनुष्यांना भवसागर तरणोपाय नाही. श्रीगुरुचरणीं अनन्यभावाने शरण जाऊन, त्यांनी कृपावंत होऊन दिलेली साधना प्रेमाने व नेमाने करण्यातच आपले सर्वांगीण हित असते, असे प. पू. श्री. मामा नेहमी सांगत असत.
( कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
( कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
0 comments:
Post a Comment