12 April 2017

*॥ अमृतबोध ॥* *१२ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - ११७ ॥*

सद्गुरु श्री ज्ञानेश्वर माउली पुढे सांगतात, *"मोक्षरेखें आला तो भाग्यें विनटला । साधूंचा अंकिला हरिभक्त ॥हरि.६.३॥"* या चरणाचा अर्थ सांगताना प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात की, "यात 'मोक्षरेखें आला' हे चरण बहारीचे आहे. मोक्षरेखेवर याचा अर्थ नीट समजून घ्यायला हवा. जसा एखादा मनुष्य गावाच्या सीमेवर आला म्हणजे तो गावात आला असे होत नाही. तसेच मोक्षाच्या सीमेवर, रेषेवर अनेक येतात, मात्र तेथवर ते स्वप्रयत्नाने येतात. परंतु त्यापुढे ते स्वबळाने जाऊ शकत नाहीत. त्या मोक्षरेखेवर आलेल्या साधकाचे भाग्य उदयाला यावे लागते, तेव्हाच तो पुढे जाऊ शकतो.
असा जो भाग्य उदयाला आलेला साधक हरिभक्तीसाठी *'साधूंचा अंकिला'* होतो, तोच यापुढचा मार्ग निर्विघ्नपणे चालून जातो. साधूंचा अंकिला होतो म्हणजे साधूंच्या सान्निध्यात राहून त्यांच्याकडून ती शक्ती, ती साधनेची युक्ती व ते ज्ञान प्राप्त करून घेतो व अभ्यासाने मुक्त होतो."
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:

Post a Comment

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Blog Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates