साधूंनी केलेल्या बोधाशी एकरूप झालेला साधक त्याही पुढे जाऊन विलक्षण अनुभूती घेतो. त्याचे वर्णन करताना सद्गुरु श्री माउली म्हणतात, *"कापुराची वाती उजळली ज्योती । ठायींच समाप्ति झाली तैसी ॥हरि.६.२॥"*
भगवान श्री माउलींच्या या कापराच्या दृष्टांताचे मार्मिक व नेमके विवरण प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज करतात. यातून त्यांच्या सूक्ष्म निरीक्षणशक्तीचा उत्तम प्रत्यय येतो.
प.पू.मामा सांगतात, "कापूर लावल्यावर त्यातून आधी वरच्या बाजूला काळा धूर येतो. त्यानंतर लाल जाळ दिसतो. त्या लालभडक जाळाचा हळूहळू शुभ्र पांढरा रंग होतो आणि त्याचवेळी अगदी खालच्या बाजूला जळत असलेला कापूरही दिसत असतो.
हळूहळू तो धूर संपतो, मग तांबडा जाळही संपतो. पांढरा प्रकाश असताना कापूर अगदी लहान लहान होत जातो. पांढरा प्रकाशही जेव्हा संपून जातो, तेव्हा त्या ठिकाणी मोरपंखी निळ्या रंगाचा छोटा बिंदू दिसू लागतो व क्षणात तो बिंदूही जेथून आला तेथेच विलीन होतो.
हीच आपली म्हणजे जीवाची गती असते. कारण *'जन्म घेणे लागे वासनेच्या संगें ।'* जन्म वासनेमुळे होतो. म्हणजे, परमेश्वराचा अंश असणारा जीव, तीन गुणांनी गुंडाळला जातो व पांचभौतिक शरीर घेऊन जन्माला येतो. त्याच्या पूर्वतयारीने मग योग्य वेळी त्याला 'साधुबोध' लाभतो.
बोध लाभल्यानंतर जेव्हा तो साधक अभ्यास करू लागतो, तेव्हा सुरुवातीला त्याच्यातील तमोगुण नाहीसा होतो, तोच कापराचा काळा धूर होय. नंतर रजोगुण नाहीसा होतो, तोच कापराचा तांबडा जाळ. शेवटी सत्त्वगुणरूप पांढरा प्रकाश पडून तोही नाहीसा होतो व तसे झाल्यावर स्वत: जीव राहतो, तो कसा दिसतो? तर मोरपंखी. पण तो बिंदूही जेथून आला तेथेच विलीनही होतो. त्यावेळी फक्त एक परमतत्त्वच उरते. या गहन-गूढ प्रक्रियेच्या संदर्भानेच सद्गुरु श्री माउली 'ठायींच समाप्ती झाली' असे म्हणतात !"
कापूर आपण रोजच पूजेत लावतो, पण इतक्या बारकाईने कधीच त्याकडे पाहात नाही. आता उद्या कापूर लावल्यावर सगळ्यांनी त्याचे नीट निरीक्षण करा आणि प.पू.श्री.मामांच्या या अनोख्या विवरणाचा मनापासून पुन्हा आस्वाद घ्या, म्हणजे माउलींचा कापराचा दृष्टांत आपल्या मनात पक्का ठसेल !
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
11 April 2017
*॥ अमृतबोध ॥* *११ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - ११६ ॥*
Subscribe to:
Post Comments (Atom)
Total Pageviews
Translate
Followers
Popular Posts
-
शुभ दीपावली !! श्रीसंत तुकाराम महाराज म्हणतात, " जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी । तेणे पथ्ये सांभाळावी ॥ " या 'विठ्ठल मात्रे'...
-
नमस्कार मित्रहो, संतांची वचने ही दीपस्तंभासारखी असतात. महासागरात वाट चुकून भलतीकडे जाणा-या जहाजांना योग्य दिशा व योग्य मार्गावर ठेवण्य...
-
श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्र हे जवळपास गेली साडेपाच हजार वर्षे लाखो भक्तांकडून मनोभावे म्हटले जात आहे. आजवरच्या सर्व भक्तांकडून या स्तोत्र...
-
ग्रंथ हे गुरु असतात, पण मर्यादित अर्थाने. कारण ग्रंथांवरून होणारे ज्ञान जोवर आपल्या अनुभवाला येत नाही तोवर ते ज्ञान अपुरेच असते...
-
साधना 'निष्कामतेने' करायची असते : साधना 'निष्कामतेने' करायची म्हणजे काय ? साधना करण्याचा तात्पुरता ऐहिक असा काहीही फायदा नाह...
-
( श्रीदत्तसंप्रदायाचे अध्वर्यू योगिराज सद्गुरु श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांच्या २६ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त विशेष लेखमाला...
-
( श्रीदत्तसंप्रदायाचे अध्वर्यू योगिराज सद्गुरु श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांच्या २६ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त विशेष लेखमाला. ...
-
भक्ती ही श्रीगुरूंनी कृपापूर्वक प्रदान करावी लागते. श्रीसंत तुकाराम महाराजही सांगतात, " नवविधा काय बोलिली जे भक्ती । ती द्यावी माझे हा...
Blog Archive
-
▼
2017
(187)
-
▼
April
(30)
- *॥ अमृतबोध ॥* *३० एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी ...
- ॥ अमृतबोध ॥* *२९ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी -...
- *॥ अमृतबोध ॥* *२८ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी ...
- *॥ अमृतबोध ॥* *२७ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी ...
- *॥ अमृतबोध ॥* *२६ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी ...
- *॥ अमृतबोध ॥* *२५ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी ...
- *॥ अमृतबोध ॥* *२४ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी ...
- *॥ अमृतबोध ॥* *२३ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी ...
- *॥ अमृतबोध ॥* *२२ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी ...
- *॥ अमृतबोध ॥* *२१ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी ...
- *॥ अमृतबोध ॥* *२० एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी ...
- *॥ अमृतबोध ॥* *१९ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी ...
- *॥ अमृतबोध ॥* *१८ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी ...
- *॥ अमृतबोध ॥* *१७ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी ...
- *॥ अमृतबोध ॥* *१६ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी ...
- *॥ अमृतबोध ॥* *१५ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी ...
- *॥ अमृतबोध ॥* *१४ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी ...
- *॥ अमृतबोध ॥* *१३ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी ...
- *॥ अमृतबोध ॥* *१२ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी ...
- *॥ अमृतबोध ॥* *११ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी ...
- *॥ अमृतबोध ॥* *१० एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी ...
- *॥ अमृतबोध ॥* *९ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी -...
- *॥ अमृतबोध ॥* *८ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी -...
- *॥ अमृतबोध ॥* *७ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी -...
- *॥ अमृतबोध ॥* *६ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी -...
- *॥ अमृतबोध ॥* *५ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी -...
- *॥ अमृतबोध ॥* *४ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी -...
- *॥ अमृतबोध ॥* *३ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी -...
- *॥ अमृतबोध ॥* *२ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी -...
- *॥ अमृतबोध ॥* *१ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी -...
-
▼
April
(30)
0 comments:
Post a Comment