28 April 2017

*॥ अमृतबोध ॥* *२८ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १३३॥*

सद्गुरु श्री माउली अभक्तांचे महत्त्वाचे लक्षण सांगतात की, एखादा तपस्वी, गुरुभक्त असेल व त्याला श्रवणेच्छाही असेल, पण तो जर श्रीभगवंतांना सामान्य मनुष्य मानत असेल, त्यांच्या सर्वसमर्थ विभूतिमत्वाची त्याला खात्री नसेल व तो भगवंतांची तसेच त्यांच्या भक्तांची निंदा करीत असेल; तर तो अभक्तांचा शिरोमणीच मानला पाहिजे. शरीर तरुण आहे, गोरे व सौंदर्यपूर्ण आहे, पण त्यात प्राणच नसेल तर काय उपयोग त्या बाकीच्या गोष्टींचा? तसेच या अभक्तांच्या बाबतीत होते.
सोन्याने मढवलेल्या देखण्या घराच्या दारात भयानक नागीण आडवी बसलेली असावी; किंवा पंचपक्वान्नांच्या ताटात विष कालवलेले असावे, वरून जिवलग मैत्री दिसावी पण पोटात मात्र कपट असावे; त्याप्रमाणे तप, गुरुभक्ती, श्रवणेच्छा इतक्या सर्व गोष्टी असून देखील, जर तो मनुष्य श्रीभगवंतांची किंवा त्यांच्या लाडक्या भक्तांची निंदा करीत असेल, तर त्याचे बाकी सर्व फुकटच होय !
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:

Post a Comment

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Blog Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates