साधूंची व्यवच्छेदक लक्षणे पू.मामासाहेब देशपांडे महाराज सांगत आहेत. काल आपण त्यांचा सर्वांभूती समभाव पाहिला. आता आणखी एक महत्त्वाचे लक्षण पू.मामा सांगतात, ते म्हणजे 'निरहंकारता' !
साधूंच्या ठिकाणी 'मी'पणाची वार्ताही नसते. जिथे मीपणा नाही, तिथे 'माझे'पणा तरी कसा निर्माण होणार? त्यामुळे या महात्म्याला कसल्याही माझेपणाचा मोहच नसतो.
सुख आणि दु:ख या दोन्ही वृत्ती 'मी' व 'माझे'शीच संबंधित असतात. माझेपणाच नसेल तर सुख आणि दु:ख होणार तरी कशाचे? त्यामुळे हा साधू सुख-दु:खांच्या पूर्ण पलीकडे गेलेला असतो. त्यामुळे हीच निरहंकार वृत्ती त्याच्याठायी अपरंपार सहिष्णुता देखील निर्माण करते. सहिष्णुतेच्या बाबतीत तो पृथ्वीशी बरोबरी करू शकतो. आपण सतत पृथ्वीवर पाय देऊन सर्व व्यवहार करतो, तिच्याच जिवावर आपले सर्व चालते, पण ती कधीतरी तिच्या अंगावर पाय दिल्याची शिक्षा करते का? तसेच हा महात्मा इतरांनी दिलेला त्रास, केलेला अपमान एक शब्दही न काढता सहन करीत असतो. अंगी सामर्थ्य असतानाही बाणलेली अशी सहिष्णुताच दैवी मानली गेलेली आहे.
निरहंकारता आणि अपार सहिष्णुता या दोन्ही सद्गुणांमुळे हा साधू अखंड समाधानातच राहतो. त्याचा 'संतोष' कोणत्याही परिस्थितीत भंगत नाही. पाऊस पडो अगर न पडो, समुद्र कायम भरलेलाच असतो; तसे हा महात्मा कोणत्याच कारणाशिवायही सदैव संतुष्टच असतो.
सद्गुरु श्री माउली येथे निरहंकारता व त्यातूनच निर्माण होणारे सहिष्णुता व संतोष; असे महात्म्यांचे तीन दैवी सद्गुण विवरून सांगतात.
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
11 March 2017
*॥ अमृतबोध ॥* *११ मार्च २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - ८५ ॥*
Subscribe to:
Post Comments (Atom)
Total Pageviews
Translate
Followers
Popular Posts
-
शुभ दीपावली !! श्रीसंत तुकाराम महाराज म्हणतात, " जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी । तेणे पथ्ये सांभाळावी ॥ " या 'विठ्ठल मात्रे...
-
नमस्कार मित्रहो, संतांची वचने ही दीपस्तंभासारखी असतात. महासागरात वाट चुकून भलतीकडे जाणा-या जहाजांना योग्य दिशा व योग्य मार्गावर ठेवण्य...
-
॥ अमृतबोध ॥ संतांचे ' सांगणे ' फार मार्मिक असते. परिस्थितीचा पुरेपूर अंदाज त्यांच्या क्रांतदर्शी विचारांनी आधीच घेतलेला असतो. ...
-
॥ अमृतबोध ॥ योगिराज सद्गुरु श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांच्या नित्य-चिंतनीय अशा ' अमृतबोध ' ग्रंथामधील प्रस्तुत उपदेश-वचन...
-
प. पू . सद्गुरु श्री. मामासाहेब देशपांडे महाराज यांच्या पुस्तकांसाठी - श्रीवामनराज प्रकाशन पुणे . ' श्रीगुरुकृपा ' , श्रीसंत ...
-
( श्रीदत्तसंप्रदायाचे अध्वर्यू योगिराज सद्गुरु श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांच्या २६ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त विशेष लेखमाला. ...
-
॥ अमृतबोध ॥ आज आषाढी एकादशी, महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या व अलौकिक संप्रदायाचा सर्वात मोठा महोत्सव. वारकरी संप्रदाय हा सर्वात शहाणा स...
-
( श्रीदत्तसंप्रदायाचे अध्वर्यू योगिराज सद्गुरु श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांच्या २६ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त विशेष लेखमाला...
Blog Archive
-
▼
2017
(187)
-
▼
March
(30)
- *॥ अमृतबोध ॥* *३० मार्च २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी -...
- *॥ अमृतबोध ॥* *२९ मार्च २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी -...
- *॥ अमृतबोध ॥* *२८ मार्च २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी -...
- *॥ अमृतबोध ॥* *२७ मार्च २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी -...
- *॥ अमृतबोध ॥* *२६ मार्च २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी -...
- ॥ अमृतबोध ॥ २५ मार्च २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - ९९ ॥
- *॥ अमृतबोध ॥* *२४ मार्च २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी -...
- *॥ अमृतबोध ॥* *२३ मार्च २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी -...
- *॥ अमृतबोध ॥* *२२ मार्च २०१७* _*श्रीपाद नवमी - प...
- *॥ अमृतबोध ॥* *२१ मार्च २०१७* *_प.पू.श्री.मामासा...
- ॥ अमृतबोध ॥ २० मार्च २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - ९४॥
- *॥ अमृतबोध ॥* *१९ मार्च २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी -...
- *॥ अमृतबोध ॥* *१८ मार्च २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी -...
- ॥ अमृतबोध ॥ १७ मार्च २०१७॥ हरिपाठ मंजिरी - ९१ ॥
- *॥ अमृतबोध ॥* *१६ मार्च २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी -...
- ॥ अमृतबोध ॥ १५ मार्च २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - ८९ ॥
- *॥ अमृतबोध ॥* *१४ मार्च २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी -...
- *॥ अमृतबोध ॥* *१३ मार्च २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी -...
- *॥ अमृतबोध ॥* *१२ मार्च २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी -...
- *॥ अमृतबोध ॥* *११ मार्च २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी -...
- *॥ अमृतबोध ॥* *१० मार्च २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी -...
- *॥ अमृतबोध ॥* *९ मार्च २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - ...
- *॥ अमृतबोध ॥* *८ मार्च २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - ...
- *॥ अमृतबोध ॥* *७ मार्च २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - ...
- *॥ अमृतबोध ॥* *६ मार्च २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - ...
- *॥ अमृतबोध ॥* *५ मार्च २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - ...
- *॥ अमृतबोध ॥* *४ मार्च २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - ...
- *॥ अमृतबोध ॥* *३ मार्च २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - ...
- *॥ अमृतबोध ॥* *२ मार्च २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - ...
- *॥ अमृतबोध ॥* *१ मार्च २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - ...
-
▼
March
(30)
0 comments:
Post a Comment