घरात लावलेला दिवा असे म्हणतो का, मी फक्त घरातल्याच लोकांना उजेड देणार? त्या दिव्याला घरचा आणि परका असा भेदच नसतो. वृक्ष कधी लावणा-यालाच सावली देणार आणि तोडणा-याला नाही देणार म्हणतो का? तो दोघांनाही सारखीच छाया देतो. ऊस देखील लावणी करून पाणी घालणा-याला व चरखात घालून गाळणा-याला सारखीच गोडी देतो; तसे हे आत्मदर्शी साधू कोणाच्याही बाबतीत शत्रू-मित्र असा भेदभाव करीत नाहीत. ते सर्वांवर समानच कृपा करतात. अशी देवदुर्लभ समभावना हेच साधूंचे मुख्य वैशिष्ट्य अाहे, असे साक्षात् जगज्जीवन परमानंदकंद भगवान श्रीकृष्ण स्वमुखाने सांगतात.
आपल्यावर जीवघेणा विषप्रयोग करणा-यावरही अनाक्रोश क्षमा करून, त्याच्यावर प्रारब्धाने आलेल्या बिकट परिस्थितीत, त्याला एका शब्दानेही न दुखवता त्याचा सर्व योगक्षेम शेवटपर्यंत वाहणारे *प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज हे या सर्व साधूलक्षणांचे मूर्तिमंत आदर्शच होते.* साधू झाल्याशिवाय साधुत्व कळत नाही, असे संतांनी सांगून ठेवलेले आहे. म्हणूनच, अशा साधूंनी अर्थात् प.पू.मामांनी केलेले हरिपाठाचे, त्यातील साधूलक्षणांचे हे स्वानुभूत विवरण आपण गेले तीन महिने सलग पाहात आहोत. आज त्यांची तारखेने सत्ताविसावी पुण्यतिथी आहे, त्यानिमित्त त्यांच्या पावन श्रीचरणीं दंडवत घालून आपण करुणाकृपा भाकूया!
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
21 March 2017
*॥ अमृतबोध ॥* *२१ मार्च २०१७* *_प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज पुण्यतिथी (तारखेने)_* *॥ हरिपाठ मंजिरी - ९५ ॥*
Subscribe to:
Post Comments (Atom)
Total Pageviews
Translate
Followers
Popular Posts
-
शुभ दीपावली !! श्रीसंत तुकाराम महाराज म्हणतात, " जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी । तेणे पथ्ये सांभाळावी ॥ " या 'विठ्ठल मात्रे...
-
नमस्कार मित्रहो, संतांची वचने ही दीपस्तंभासारखी असतात. महासागरात वाट चुकून भलतीकडे जाणा-या जहाजांना योग्य दिशा व योग्य मार्गावर ठेवण्य...
-
॥ अमृतबोध ॥ संतांचे ' सांगणे ' फार मार्मिक असते. परिस्थितीचा पुरेपूर अंदाज त्यांच्या क्रांतदर्शी विचारांनी आधीच घेतलेला असतो. ...
-
॥ अमृतबोध ॥ योगिराज सद्गुरु श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांच्या नित्य-चिंतनीय अशा ' अमृतबोध ' ग्रंथामधील प्रस्तुत उपदेश-वचन...
-
प. पू . सद्गुरु श्री. मामासाहेब देशपांडे महाराज यांच्या पुस्तकांसाठी - श्रीवामनराज प्रकाशन पुणे . ' श्रीगुरुकृपा ' , श्रीसंत ...
-
( श्रीदत्तसंप्रदायाचे अध्वर्यू योगिराज सद्गुरु श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांच्या २६ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त विशेष लेखमाला. ...
-
॥ अमृतबोध ॥ आज आषाढी एकादशी, महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या व अलौकिक संप्रदायाचा सर्वात मोठा महोत्सव. वारकरी संप्रदाय हा सर्वात शहाणा स...
-
( श्रीदत्तसंप्रदायाचे अध्वर्यू योगिराज सद्गुरु श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांच्या २६ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त विशेष लेखमाला...
Blog Archive
-
▼
2017
(187)
-
▼
March
(30)
- *॥ अमृतबोध ॥* *३० मार्च २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी -...
- *॥ अमृतबोध ॥* *२९ मार्च २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी -...
- *॥ अमृतबोध ॥* *२८ मार्च २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी -...
- *॥ अमृतबोध ॥* *२७ मार्च २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी -...
- *॥ अमृतबोध ॥* *२६ मार्च २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी -...
- ॥ अमृतबोध ॥ २५ मार्च २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - ९९ ॥
- *॥ अमृतबोध ॥* *२४ मार्च २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी -...
- *॥ अमृतबोध ॥* *२३ मार्च २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी -...
- *॥ अमृतबोध ॥* *२२ मार्च २०१७* _*श्रीपाद नवमी - प...
- *॥ अमृतबोध ॥* *२१ मार्च २०१७* *_प.पू.श्री.मामासा...
- ॥ अमृतबोध ॥ २० मार्च २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - ९४॥
- *॥ अमृतबोध ॥* *१९ मार्च २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी -...
- *॥ अमृतबोध ॥* *१८ मार्च २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी -...
- ॥ अमृतबोध ॥ १७ मार्च २०१७॥ हरिपाठ मंजिरी - ९१ ॥
- *॥ अमृतबोध ॥* *१६ मार्च २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी -...
- ॥ अमृतबोध ॥ १५ मार्च २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - ८९ ॥
- *॥ अमृतबोध ॥* *१४ मार्च २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी -...
- *॥ अमृतबोध ॥* *१३ मार्च २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी -...
- *॥ अमृतबोध ॥* *१२ मार्च २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी -...
- *॥ अमृतबोध ॥* *११ मार्च २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी -...
- *॥ अमृतबोध ॥* *१० मार्च २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी -...
- *॥ अमृतबोध ॥* *९ मार्च २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - ...
- *॥ अमृतबोध ॥* *८ मार्च २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - ...
- *॥ अमृतबोध ॥* *७ मार्च २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - ...
- *॥ अमृतबोध ॥* *६ मार्च २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - ...
- *॥ अमृतबोध ॥* *५ मार्च २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - ...
- *॥ अमृतबोध ॥* *४ मार्च २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - ...
- *॥ अमृतबोध ॥* *३ मार्च २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - ...
- *॥ अमृतबोध ॥* *२ मार्च २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - ...
- *॥ अमृतबोध ॥* *१ मार्च २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - ...
-
▼
March
(30)
0 comments:
Post a Comment