आत्मरूपी विसावलेल्या साधूंची आणखी काही दिव्य लक्षणे श्रीभगवंत प्रेमाने सांगत आहेत.
हे साधू अंतर्बाह्य सूर्याप्रमाणे तेजस्वी असतात. त्यांच्याठायी आत-बाहेर कसलाही अंधकार नसतो. ग्रंथांमधील, शास्त्रांमधील तत्त्वरूप धनाचा नेमका ठाव जाणणारे तेच खरे पायाळू असतात. त्यांचे मन विश्वाकार झाल्याने आकाशाप्रमाणे व्यापक असते. कशातच लिप्त नसल्याने ते उदासीनही असतात. शिवाय यच्चयावत् सर्व गोष्टींचे त्यांना इत्थंभूत ज्ञान असते. एखाद्या पारध्याच्या तावडीतून सुटून आकाशात स्वैर स्वच्छंद भ्रमण करणा-या ऐटबाज पक्षाप्रमाणे ते साधू संसार-दु:खांपासून मुक्त होऊन, आशापाशरहित होऊन चिदाकाशात आनंद-विहार करीत असतात. सदैव आत्मसुखातच रममाण होऊन वावरत असतात.
श्रीभगवंत ज्यांचे एवढे भरभरून कौतुक करीत आहेत, त्या हरिरंगी रंगलेल्या साधूंची ही स्थिती केवळ अनुभवानेच समजू शकते, नुसत्या शब्दांनी जाणणे केवळ अशक्य आहे !
ज्यांचे अवघे अस्तित्वच सर्व रंगांचे अधिष्ठान असणा-या श्रीरंगांच्या दिव्य श्यामरंगात अंतर्बाह्य न्हालेले असते; असा 'अवघा रंग एक जाला' म्हटल्यावर, त्यांच्यासाठी वेगळी, एका दिवसाची रंगपंचमी ती काय बरे? त्यांचे समग्र जीवन हीच एक अलौकिक, अद्भुत, अवीट व अविरत चालणारी 'श्रीरंग-पंचमी' असते !!
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:
Post a Comment