॥ अमृतबोध ॥
१५ मार्च २०१७
॥ हरिपाठ मंजिरी - ८९ ॥
साधूंचे जगावेगळे अलौकिकत्व सांगताना श्रीभगवंत म्हणतात, हे साधू आत्मानंदाने तृप्त झालेले असतात, त्यामुळे त्यांच्याठिकाणी कसल्याही भोगाचा, अपेक्षेचा शिरकावच होत नाही. तेच मुक्ततेचा आधार बनून वावरत असतात. पूर्णावस्थेचे जिवलग असणारे हे साधू आपल्या नुसत्या अस्तित्वानेही सर्वत्र सुखाची भरभराट करीत असतात.
काशी हे क्षेत्र मोक्षपुरी म्हणून प्रसिद्ध आहे; पण तेथे मेल्यावरच मोक्ष मिळतो. हिमालय पर्वतही पापांचा नाश करतो; पण तेथेही थंडीने काकडून मरण्याचीच जास्त भीती असते. पण साधूंचे तसे नाही. त्यांचे पावनकारित्व यांपैकी नाही. ते कोणताही तोटा होऊ न देताच मोक्ष देतात. म्हणून ते काशी व हिमालयाहूनही श्रेष्ठ आहेत !
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:
Post a Comment