॥ अमृतबोध ॥
२० मार्च २०१७
॥ हरिपाठ मंजिरी - ९४॥
श्रीभगवंतांना आपल्या या अनन्य भक्तांचे अतीव प्रेम असते. त्यांची स्तुती करताना पोटच भरत नाहीये त्यांचे. काय सांगू न् काय नको, अशी त्यांची स्थिती झालेली आहे. श्रीभगवंतांचे ते ओसंडून वाहणारे अपरंपार भक्तप्रेम प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज फार मोहकपणे सांगतात.
अर्जुनाला देव स्वमुखाने सांगतात की, "अरे, आम्ही केवळ आमच्या या लाडक्या भक्तांसाठीच सगुण रूप धारण करून पृथ्वीवर विविध अवतार घेऊन येतो. त्यांच्यावरून जीवभाव ओवाळून टाकावा, असेच आम्हांला सतत वाटत असते.
आत्मलाभ झालेला असल्याने त्यांना इतर काहीही प्राप्त झाल्याने हर्ष होत नाही. आपणच विश्वरूप झालेले असल्याने भेदभावरहित झालेले ते कोणत्याही गोष्टीबद्दल विषाद मानीत नाहीत. जे खरोखरीच आपले आहे, ते आपल्यापासून कधीच वेगळे होऊ शकत नाही, या भावनेमुळे काही गेल्याचा ते शोक करीत नाहीत."
या साधूंचा आदर्श ठेवून जर आपण वागलो, तर नि:संशय त्यांच्याकृपेने कायमचे सुखी होऊन जाऊ, यात शंका नाही !
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:
Post a Comment