16 March 2017

*॥ अमृतबोध ॥* *१६ मार्च २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - ९० ॥*

साधूंचे पावनकारित्व सांगताना श्रीभगवंतांचे समाधानच होत नाहीये. आता ते गंगामैयाहूनही साधू व साधूंच्या कृपेने लाभणारी भक्तिगंगा कशी श्रेष्ठ आहे ते सांगत आहेत. श्रीभगवंतांचे मनोगत व्यक्त करताना प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात की, गंगा नदी पवित्र आहे व सर्वांना ती पवित्र करते, पाप-ताप घालविते. पण तिच्यात बुडण्याची भीती असतेच. पात्र किती खोल आहे आणि रुंद आहे हे ठाऊक नसले तरी, साधुकृपेने लाभणा-या भक्तिगंगेत कोणी बुडून मरत तर नाहीच; पण त्याला न मरताच जिवंतपणी मोक्ष लाभतो. सत्पुरुषांच्या अंगस्पर्शाने गंगाही पापनिर्मुक्त होते, मग ते साधू किती पवित्र असतील बरे?
म्हणूनच, साधू हेच तीर्थांनाही तीर्थत्व देणारे, त्या तीर्थांनी साठवलेला लोकांचा मल नष्ट करणारे महापवित्र तीर्थराज आहेत. त्यांच्याच कृपेने साधकाचा मनोमळ नाहीसा होऊन तो साधकही अंतर्बाह्य पुनीत होतो. साधुसंतांचे पावनकारित्व असे सर्वश्रेष्ठच असते.
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:

Post a Comment

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Blog Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates