
सद्गुरु श्री माउली हरिपाठाच्या सातव्या अभंगाच्या तिस-या चरणात वाचाळांबद्दल सांगतात की, *"अनंत वाचाळ बरळती बरळ । त्यां कैचेनि गोपाळ पावे हरि ॥७.३॥"*
याचे विवरण करताना प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात, पुष्कळ मंडळी निरनिराळे ग्रंथ वाचून, किंबहुना पाठ करून त्यांची प्रमाणे देऊन आपण ज्ञानी असल्याचे...