२० ऑगस्ट २०१६
आपल्या बुद्धीचे कार्य हे फार विलक्षण असते. ती योग्य-अयोग्य निर्णय करून आपल्याला हिताचेच वागायला प्रवृृत्त करीत असते. तिच्या या सामर्थ्यालाच ' विवेक ' म्हणतात. हा विवेक ज्याचा सखा होतो, तोच सर्व बाजूंनी समाधानी होत असतो. पण हा विवेक योग्यवेळी सुचणे हे मात्र संतांच्या, सद्गुरूंच्या कृपेचेच फलित आहे; ते आपल्या बुद्धीचे काम नव्हे. " विवेक तो मुख्य कृपेचे लक्षण । गर्भासी भूषण बुद्धिचिया ॥ ", असे पू. श्री. शिरीषदादा कवडे आपल्या एका अभंगात म्हणतात. यासाठीच प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज स्पष्ट सांगतात की, विवेक हा केवळ साधुसंतांच्या, सद्गुरूंच्या सहवासात त्यांच्या कृपेनेच प्राप्त होत असतो, म्हणून आपण त्यांची संगत कधीही सोडता कामा नये.
( कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
( कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
0 comments:
Post a Comment