९ ऑगस्ट २०१६
या जगात सुख-दु:खांचा अनुभव सर्वांना सतत येतच असतो. सुखाने आनंद तर दु:खाने विषाद निर्माण होतो. सामान्यपणे आपण सुखाने वाहावत जातो तर दु:खाने खचून जातो. या दोन्ही गोष्टी तोट्याच्याच आहेत. पण कोणीही या टाळू शकत नाही. संतच फक्त यांच्या पलीकडे गेलेेले असल्याने, सुख-दु:खांच्या विषयी आपल्याला यथार्थ मार्गदर्शन करतात. यासाठीच प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात की, श्रीभगवंत हे अखंड सुखस्वरूपच आहेत, ही निष्ठा पक्की झाली की, आपली दु:खे सहन करण्याची क्षमता दृढावते. ही वाढावी म्हणून आपण श्रीभगवंतांवरचे आपले प्रेम व निष्ठा सतत कशी वृद्धिंगत होईल, याचाच पाठपुरावा करावा. या प्रेमादरापोटीच दु:खे ही दु:खे वाटेनाशीच होतात आणि मग आपला आनंद कशानेही, कोणत्याही परिस्थितीत गढूळ होत नाही. हा परमार्थाचा, भक्तीचा फार मोठा लाभ आहे.
( कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
( कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
0 comments:
Post a Comment