२२ ऑगस्ट २०१६
प. प. श्री. वासुदेवानंद सरस्वती (टेंब्ये) स्वामी महाराज जयंती !
देव ते संत देव ते संत । निमित्त त्या प्रतिमा ॥ असे श्रीतुकाराम महाराज म्हणतात. श्रीभगवंत आणि त्यांचेच अभिन्न स्वरूप असणारे साधुसंत; दोघेही जगाच्या कल्याणासाठीच सतत झटत असतात. प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात की, श्रीभगवंतांचे हृदय म्हणजे संत होत, तर संतांच्या हृदयात अनंत, अपार असे श्रीभगवंत समग्र व्यापून राहिलेले असतात. हृदय हे प्रेमाचे स्थान आहे, म्हणूनच संतांचे व श्रीभगवंतांचे परमप्रेमाने झालेले एकरूपत्व प. पू. श्री. मामा यातून सांगत आहेत. अशाच परिपूर्ण श्रीदत्तस्वरूप, श्रीदत्तहृदय परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमत् वासुदेवानंद सरस्वती (टेंब्ये) स्वामी महाराजांची आज १६२ वी जयंती. त्यांच्या श्रीचरणारविंदी सादर साष्टांग दंडवत !!
( कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
( कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
0 comments:
Post a Comment