२५ ऑगस्ट २०१६
॥ श्रीजन्माष्टमी ॥
श्रीभगवंतांचा आणि साधूसंतांचा अवतार हा जगाच्या शाश्वत कल्याणासाठीच असला तरी त्यांच्या कार्यात किंचित फरक असतो. तो फरक नेमकेपणे प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज सांगतात. श्रीभगवंत जन्मल्याबरोबर आपल्या लोकोद्धाराच्या कार्याला सुरुवात करतात, म्हणून श्रीभगवंतांची जयंतीच मोठ्या प्रमाणावर साजरी होते. तर संतांचे महत्त्व त्यांनी देह ठेवल्यावरच लोकांच्या लक्षात येत असते, ते देहात असताना फारच थोडे लोक त्यांचे ऐकतात, त्यांना मानतात. संतांचे कार्य त्यांच्या देहत्यागापासूनच ख-या अर्थाने सुरू होत असल्याने संतांची पुण्यतिथी करायची पद्धत भक्तिसंप्रदायात रूढ झालेली आहे.
आज परिपूर्ण परब्रह्म भगवान श्रीकृष्णचंद्र प्रभूंचा व त्यांचे अभिन्न परिपूर्णतम अवतार भगवान सद्गुरु श्रीज्ञानेश्वर माउलींचा जन्मदिवस. या एकरूप एकरस परब्रह्मचरणीं अनंतानंत दंडवत प्रणाम !!!
( कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:
Post a Comment