कोणत्याही विषयाचे समाधान आपल्याला कधी मिळते? तो भोग चालू असताना ते समाधान कधीच पूर्णत्वाला जात नाही, भोग संपल्यावरच ते पूर्णपणे लाभते. साधे उदाहरण पाहा, आपण पंचपक्वान्नांचे जेवण जेवत आहोत, त्याचे समाधान कधी मिळते? ते जेवण जेऊन पूर्ण झाल्यावरच आपण म्हणतो ना, काय मस्त पोट भरले ! म्हणजे तो भोग संपल्यावर आणि पुढे त्याची कसलीच इच्छाही राहिलेली नसताना आपल्याला खरे समाधान मिळाले. म्हणून प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज सांगतात की, खरे समाधान विषयांच्या भोगात नसून त्यांच्या आत्यंतिक वैराग्यातच असते. किंबहुना ते वैराग्य हेच समाधानाचे लक्षण आहे.
विषय आगीसारखे असतात. आगीत कितीही इंधन घाला, ती शांत होत नसते, उलट अधिकच भडकते. तसे विषय कितीही उपभोगा, त्यांची शांती कधीच होत नसते. भोगाने ते प्रचंड वाढतच जातात; आणि जिथे अजून हाव असते तिथे समाधान कधीच नसते.
नेमके हेच लक्षात न घेतल्यामुळे, आपण ऊर फाटेपर्यंत धावपळ करतो आणि ज्या विषयांसाठी एवढे कष्ट करतो त्यांचे समाधानही मग नीट भोगणे आपल्याला शक्य होत नाही.
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
13 October 2016
॥ अमृतबोध ॥ १३ ऑक्टोबर २०१६
Subscribe to:
Post Comments (Atom)
Total Pageviews
Translate
Followers
Popular Posts
-
शुभ दीपावली !! श्रीसंत तुकाराम महाराज म्हणतात, " जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी । तेणे पथ्ये सांभाळावी ॥ " या 'विठ्ठल मात्रे...
-
॥ अमृतबोध ॥ संतांचे ' सांगणे ' फार मार्मिक असते. परिस्थितीचा पुरेपूर अंदाज त्यांच्या क्रांतदर्शी विचारांनी आधीच घेतलेला असतो. ...
-
नमस्कार मित्रहो, संतांची वचने ही दीपस्तंभासारखी असतात. महासागरात वाट चुकून भलतीकडे जाणा-या जहाजांना योग्य दिशा व योग्य मार्गावर ठेवण्य...
-
( श्रीदत्तसंप्रदायाचे अध्वर्यू योगिराज सद्गुरु श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांच्या २६ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त विशेष लेखमाला...
-
प. पू . सद्गुरु श्री. मामासाहेब देशपांडे महाराज यांच्या पुस्तकांसाठी - श्रीवामनराज प्रकाशन पुणे . ' श्रीगुरुकृपा ' , श्रीसंत ...
-
( श्रीदत्तसंप्रदायाचे अध्वर्यू योगिराज सद्गुरु श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांच्या २६ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त विशेष लेखमाला. ...
-
॥ अमृतबोध ॥ योगिराज सद्गुरु श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांच्या नित्य-चिंतनीय अशा ' अमृतबोध ' ग्रंथामधील प्रस्तुत उपदेश-वचन...
Blog Archive
-
▼
2016
(210)
-
▼
October
(31)
- ॥ अमृतबोध ॥ ३१ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ३० ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ २९ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ २८ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ २७ ऑक्टोबर २०१६ श्रीगुरुद्वादशी !!
- ॥ अमृतबोध ॥ २६ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ २५ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ २४ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ २३ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ २२ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ २१ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥२० ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ १९ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥१८ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥१७ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ १६ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ १५ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ १४ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ १३ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ १२ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ** जागर आदिशक्तीचा ** ११ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ * जागर आदिशक्तीचा * १० ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ** जागर आदिशक्तीचा ** ९ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ** जागर आदिशक्तीचा ** ८ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ** जागर आदिशक्तीचा ** ७ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ** जागर आदिशक्तीचा ** ६ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ** जागर आदिशक्तीचा ** ५ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ** जागर आदिशक्तीचा ** ४ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ** जागर आदिशक्तीचा ** ३ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ** जागर आदिशक्तीचा ** २ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ** जागर आदिशक्तीचा ** १ ऑक्टोबर २०१६
-
▼
October
(31)
0 comments:
Post a Comment