सतत संकल्प विकल्प करणे हे मनाचे मुख्य काम आहे. एखाद्या गोष्टीची कल्पना करणे, त्याबद्दल विचारांचे इमले रचणे हा संकल्प तर क्षणात तो संकल्प नष्ट करणे हा विकल्प होय. आलटून पालटून हेच करत असते आपले मन.
याच मनाचा दुसरा एक भाग श्री माउली सांगतात की, हे मन एखाद्या गोष्टीची गोडी लागली की तेथे चांगलेच सोकावते. त्याचे असे सोकावणे ब-याच वेळा मोठ्या संकटांनाही आमंत्रण देते. भुंगा व कमळाचे उदाहरण सर्वश्रुत आहेच. एखादे व्यसन जोवर लागत नाही तोवर ठीक आहे, पण एकदा ते लागले की मग त्यातून सुटणे भयंकर अवघड असते; हे या मनाच्याच प्रभावामुळे.
एखाद्या गोष्टीची जर मनाला अशी सवय झालेली नसेल, तर मात्र ती गोष्ट आपल्याला फारशी त्रासदायक ठरत नाही; असे प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज आवर्जून सांगतात. सवय नसेल झालेली तर ते सुटते पण पटकन. म्हणून नको त्या व दूरगामी हिताच्या नसलेल्या गोष्टींची सवय लावून घेऊच नये, हेच उत्तम. त्याचवेळी मनाच्या या दुर्गुणाचा लाभही करून घ्यावा. त्याला श्रीभगवंतांच्या स्मरणाचीच सवय लावावी, त्यात ते जितके जितके सोकावेल, तितका तितका आपला महालाभच होईल !
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:
Post a Comment