श्रीभगवंतांची प्राप्ती होणे, हेच मनुष्यजन्माचे सर्वश्रेष्ठ सुफल आहे. कारण चौ-याऐंशी लक्ष जीवयोनींपैकी केवळ याच एका योनीत, मनुष्यजन्मातच बुद्धीचे विशेष वरदान असल्याने श्रीभगवंत जाणले जाऊ शकतात. पण; ही खूप कठीण व अशक्यप्राय गोष्ट साधेल कशी? काय काय विघ्ने समोर येतील? नक्की जमेल का आपल्याला एवढे? अशा प्रकारचे अनेक संशय त्यावेळी निर्माण होतात व आपल्याला हतधैर्य करीत असतात. अशावेळी आपल्या मनात असलेला साधनेचा निश्चय खूप उपयोगी पडतो. म्हणूनच पूर्वीच्या ज्ञानी महात्म्यांनी साधनेच्या सुरवातीच्या काळात, साधकाच्या ठायी वसत असलेल्या या निर्धाराला, निश्चयाला फार महत्त्व दिलेले दिसून येते. अर्थात् तो निश्चयही आपल्या पुण्याईचे फळ व श्रीगुरुकृपेचेच अगाध देणे असतो !
साधना नियमितपणे व प्रेमाने होण्यात या निश्चयाचा फार मोठा वाटा असल्याने, साधकांनी हा निश्चयच आधी दृढ केला पाहिजे, या महत्त्वपूर्ण सिद्धांताची प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज आजच्या अमृतबोधातून आपल्याला जाणीव करून देतात !
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:
Post a Comment