एखाद्या घाणेरड्या भांड्यात उत्तम बासुंदी ठेवता येईल का? तसे अशुद्ध व मलिन अंत:करणरूपी पात्रात ज्ञानरूपी अमृतही राहू शकत नाही. श्रीगुरुकृपेने प्रेममुद्रा लाभल्यानंतर जी नवविधा भक्ती आपोआप घडू लागते, तिच्या योगाने त्या साधकाचे; मन, बुद्धी, चित्त व अहंकार यांनी बनलेले अंत:करण शुद्ध होते व त्यात ज्ञान प्रकट होऊन स्थिरावते. श्रीकृपेने साधना नीट होत राहिल्याने त्या साधकाच्या वृत्ती बाह्यत: प्रपंचात आणि अंतर्यामी परमार्थातच मग्न राहतात. सोने मुशीत घातल्यावर त्यातील हीण जसे जळून जाते, तसे मनाचे संकल्प-विकल्प, वासना, विकार हे हीण साधना व ज्ञानरूपी अग्नीत जळून गेल्यावर मगच त्या बावनकशी सोन्यासारख्या विशुद्घ अंत:करणात आत्मबोध प्रकटतो.
सामान्य माणूस असा परमार्थाकडे सहज कधी वळत नाही. तेथे त्याला काहीतरी अद्भुत दिसावे लागते, मगच तो आकर्षिला जातो. म्हणून ती आदिशक्ती साधनेत नित्य नव्या अद्भुतरसाची, अद्भुत अनुभूतींची खाणच निर्माण करून साधकाला त्याच आनंदात गुंग करते. त्यानंतरच त्या साधकाचा परमार्थ त्याच्यासाठी मोठा आनंददायक व सुखकारक ठरतो. या प्रवासात सद्गुरुकृपेने जागलेला सद्भाव हाच जवळचा सखा बनून सतत साथ देतो. वैराग्यरूपी ज्ञानाग्नी नको ते सर्व जाळून काढत साधकाची अंतर्बाह्य शुद्धी करतो. या आनंदानुभवामुळे तो साधक रोजच नवनव्या उत्साहाने साधनारत होऊन, भगवती आदिशक्तीचा हा अपूर्व जागर सप्रेम अनुभवून शाश्वत समाधान पावतो, असे प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज येथे स्वानुभवपूर्वक सांगतात.
उदो बोला उदो उदो सद्गुरुमाउलीचा वो ।
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:
Post a Comment