11 October 2016

॥ अमृतबोध ॥ ** जागर आदिशक्तीचा ** ११ ऑक्टोबर २०१६


श्रीसद्गुरु ' प्रेममुद्रा ' देतात म्हणजे काय करतात? तर ते कृपावंत होऊन स्वत:लाच शिष्याच्या हृदयात प्रतिष्ठापित करतात. मग ते श्रीसद्गुरूच शिष्याच्या अंतरी बसून त्याला सुयोग्य मार्ग दाखवीत साधनेच्या प्रांतात अग्रेसर करतात. आदिशक्तीचा जागर हा असा संपन्न होत असतो. तो ज्या क्षणी पूर्णतेला पावतो तोच दसरा होय ! आज आदिशक्तीच्या जागराची पूर्णाहुती....विजयादशमी !
" नवरात्रात नवविधा भक्तीच्या नऊ पाय-या चढून दहाव्या दिवशी सहस्रारचक्रात जीवाचे ख-या अर्थाने आत्मनिवेदन होते. जेथे जीवदशा हरते तो दशहरा !  सहस्रारचक्रात जीवाचे जीवपण संपते व शिवत्व प्रकटते; तेथेच दशहरा पूर्ण होतो. जीव मूळचा विजयच आहे. जीवत्व हा केवळ भास आहे. विजयस्वरूप श्रीभगवंतांची 'विजया' नावाची शक्ती नवरात्रीच्या एकेका दिवसात एक एक टप्पा ओलांडून वर येते आणि दहाव्या दिवशी आपले 'विजया' स्वरूप टाकून विजयस्वरूप होते. म्हणून मग 'विजय' नाव असलेला जीवही, विजयास्वरूप टाकून विजयस्वरूप होतो. यालाच 'विजयादशमी' म्हणतात. येथेच जीवत्वाचे सीमोल्लंघन होऊन अद्वैत पूर्ण होते !" असा अपूर्व गूढार्थ प. पू. श्री. शिरीषदादा कवडे सांगतात.
आदिशक्ती अनंत आहे, म्हणून तिच्या लीलांनाही अंत ना पार. त्यांचा कोणालाही थांग लागणे शक्य नाही. भगवती कुंडलिनी जगदंबेच्या कृपेने अनुभवाला येणारा हा ' सण ' मार्मिक व नेमक्या शब्दांमध्ये विशद करताना प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात, " संतांचे स्मरण करून, त्यांना शरण जाऊन त्यांना हृदयात स्थापन करावे. हृदयातल्या त्यांच्या वास्तव्याने जे घडेल त्यालाच  ' दसरा ' म्हणतात. तोच खरा सण ! " म्हणजे आपली जबाबदारी सोपी आहे, आपण फक्त श्रीसद्गुरूंचे श्रीचरण आपल्या हृदयात घट्ट धरून ठेवायचे आहेत. घटस्थापना तेवढी आपण करायची, नवरात्र व त्यानंतरचा दसरा साजरा करण्याचे बाकीचे सर्व कार्य त्या कृपाळू भगवती आदिशक्तीचेच आहे आणि ती ते नक्कीच सर्वार्थाने संपन्न करेल, यात शंका नाही !
अशाप्रकारे श्रीकृपेने आपल्या हृदयातच साज-या होणा-या या अलौकिक विजयादशमी सणाच्या सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा !
गेले अकरा दिवस शारदीय नवरात्रीचे औचित्य साधून, प. पू. श्री. मामांनी स्वानुभवपूर्वक कथन केलेला ' आदिशक्तीचा जागर ' आपण सप्रेम अनुभवत आहोत. विशुद्ध परमार्थाचा कृपा-क्रम सांगणारा हा जागर कृपया एकवार वेळ काढून पहिल्यापासून सलग वाचावा ही विनंती. म्हणजे त्याची अधिक जाणती अनुभूती येईल व पू. श्री. मामांचे हे अद्भुत सांगणे मनाच्या गाभ्यात उतरेल. भगवती आदिशक्तीचा हा सुवर्ण प्रचिती-फुलोरा खरोखरीच मोठा आनंददायक व चित्तवेधक आहे, यात शंका नाही !
उदो बोला उदो उदो सद्गुरुमाउलीचा वो ।
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:

Post a Comment

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Blog Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates