एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा, वारंवार करणे म्हणजे अभ्यास ! सतत केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांनी त्या गोष्टीवर प्रभुत्व मिळते किंवा ती करताना सहजता येते. हेच अभ्यासाचे फळ आहे. भगवान श्री माउली म्हणतात की, अभ्यास केला तर जगात काहीच दुष्कर, अशक्य नाही. या अभ्यासाच्याच बळावर, प्राप्त होण्यास अत्यंत कठीण असा परमात्मा सुद्धा पूर्णपणे आपलासा होतो. श्री तुकाराम महाराजही म्हणतात, ' असाध्य ते साध्य करिता सायास । कारण अभ्यास तुका म्हणे ॥ '
अभ्यासाचे माहात्म्य सांगताना प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात की, प्रेमाने व नेमाने केलेल्या अभ्यासाने अज्ञानी माणूसही तज्ज्ञ होतो ! निर्धार, चिकाटी, सातत्य आणि प्रेम; हे अभ्यास रूपी महालाचे चार मुख्य खांब आहेत, ते मात्र भक्कम हवेत !
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:
Post a Comment