भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाचा स्वजनांविषयीचा मोेह जाण्यासाठीच श्रीगीतेचा पावन उपदेश केला. कोणत्या ना कोणत्या रूपात मोह आपल्या प्रत्येकाच्या मनात असतोच. काम, क्रोध, लोभ, अहंकार व मत्सर हे पाच रिपू काही काळच प्रभाव दाखवतात, नंतर शांत होतात. पण मोह मात्र सतत जागताच असतो, कारण तोच अज्ञानाचे मूर्तिमंत रूप आहे; आणि पूर्ण ज्ञान होईपर्यंत अज्ञान राहणारच ना! म्हणूनच श्रीगुरुकृपेने ही ज्ञानशक्ती श्रीजगदंबा प्रकटली की आधी याचेच निर्दाळण करते. तिच्या त्या शुद्धीच्या प्रक्रियेत मग बाकीचेही रिपू आपोआप नष्ट होतात.
महिषासुरवधाचा फार मार्मिक संदर्भ प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज सांगतात. त्यांच्या सूक्ष्म चिंतनाचा तो अद्भुत परिपाकच म्हणायला हवा. सप्तशतीमधील कथेचा अचूक व स्वानुभवपूर्ण विचार मांडताना ते म्हणतात, महिषासुराने रेड्याचे मायिक रूप घेऊन युद्ध सुरू केले. भगवतीने त्या रेड्याचे मुंडके उडवले व त्याबरोबर त्या रेड्याच्या रूपातला असुर मात्र तिला शरण आला. हेच भगवान श्री माउली ज्ञानेश्वरीच्या बाराव्या अध्यायातही सांगतात. प्राणशक्ती चामुंडा देवीपुढे, संकल्परूप मेंढा मारून तिला मनोरूप महिषाचे मुंडके बळी दिले. म्हणजे मनाच्या मोहादी विकारांची, संकल्प-विकल्पांची निवृत्ती झाली. मनोरूप महिषाचे मर्दन झाल्यामुळे, कसलाही आधारच राहिला नाही म्हणून मग मोहरूपी असुर देवीला शरण आला. हेच श्रीभगवतीचे मुख्य कार्य आहे. पण ती एवढ्यावरच थांबत नाही बरे. यापुढेच तर खरी गंमत आहे !
उदो बोला उदो उदो सद्गुरुमाउलीचा वो ।
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
7 October 2016
॥ अमृतबोध ॥ ** जागर आदिशक्तीचा ** ७ ऑक्टोबर २०१६
Subscribe to:
Post Comments (Atom)
Total Pageviews
Translate
Followers
Popular Posts
-
शुभ दीपावली !! श्रीसंत तुकाराम महाराज म्हणतात, " जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी । तेणे पथ्ये सांभाळावी ॥ " या 'विठ्ठल मात्रे'...
-
नमस्कार मित्रहो, संतांची वचने ही दीपस्तंभासारखी असतात. महासागरात वाट चुकून भलतीकडे जाणा-या जहाजांना योग्य दिशा व योग्य मार्गावर ठेवण्य...
-
श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्र हे जवळपास गेली साडेपाच हजार वर्षे लाखो भक्तांकडून मनोभावे म्हटले जात आहे. आजवरच्या सर्व भक्तांकडून या स्तोत्र...
-
ग्रंथ हे गुरु असतात, पण मर्यादित अर्थाने. कारण ग्रंथांवरून होणारे ज्ञान जोवर आपल्या अनुभवाला येत नाही तोवर ते ज्ञान अपुरेच असते...
-
साधना 'निष्कामतेने' करायची असते : साधना 'निष्कामतेने' करायची म्हणजे काय ? साधना करण्याचा तात्पुरता ऐहिक असा काहीही फायदा नाह...
-
( श्रीदत्तसंप्रदायाचे अध्वर्यू योगिराज सद्गुरु श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांच्या २६ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त विशेष लेखमाला...
-
( श्रीदत्तसंप्रदायाचे अध्वर्यू योगिराज सद्गुरु श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांच्या २६ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त विशेष लेखमाला. ...
-
भक्ती ही श्रीगुरूंनी कृपापूर्वक प्रदान करावी लागते. श्रीसंत तुकाराम महाराजही सांगतात, " नवविधा काय बोलिली जे भक्ती । ती द्यावी माझे हा...
Blog Archive
-
▼
2016
(210)
-
▼
October
(31)
- ॥ अमृतबोध ॥ ३१ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ३० ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ २९ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ २८ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ २७ ऑक्टोबर २०१६ श्रीगुरुद्वादशी !!
- ॥ अमृतबोध ॥ २६ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ २५ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ २४ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ २३ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ २२ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ २१ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥२० ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ १९ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥१८ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥१७ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ १६ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ १५ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ १४ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ १३ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ १२ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ** जागर आदिशक्तीचा ** ११ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ * जागर आदिशक्तीचा * १० ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ** जागर आदिशक्तीचा ** ९ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ** जागर आदिशक्तीचा ** ८ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ** जागर आदिशक्तीचा ** ७ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ** जागर आदिशक्तीचा ** ६ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ** जागर आदिशक्तीचा ** ५ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ** जागर आदिशक्तीचा ** ४ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ** जागर आदिशक्तीचा ** ३ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ** जागर आदिशक्तीचा ** २ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ** जागर आदिशक्तीचा ** १ ऑक्टोबर २०१६
-
▼
October
(31)
Bola Ambe Mata ki jai!!
ReplyDeleteBola Ambe Mata ki jai!!
ReplyDelete