एकदा देव दानवांचे मोठे युद्ध झाले. त्यात परब्रह्माच्या कृपेने देव विजयी झाले. पण देवतांना वाटले की हा आमचाच विजय आहे. ब्रह्माने देवांचा अहंकार जाणला व ते विचित्र यक्ष रूप घेऊन त्यांच्या समोर प्रकटले. देवांना काही ते रूप ओळखता आले नाही. म्हणून त्यांनी अग्निदेवांना ते रूप जाणण्यासाठी पाठवले. समोर आलेल्या अग्नीला तू कोण म्हणून ब्रह्माने विचारले. अग्नी म्हणाला, मी अग्नी आहे. पृथ्वीवर जे जे काही आहे ते सर्व मी जाळून टाकू शकतो, म्हणून मला जातवेद असेही म्हणतात. ब्रह्माने तेथे पडलेली काडी उचलली व तिला जाळून दाखवायला सांगितली. सर्व शक्ती वापरूनही ती काडी काही अग्नी जाळू शकला नाही. तो खजील होऊन परत आला. हीच गत वायूचीही झाली. तो सुद्धा ती काडी उडवून लावू शकला नाही व तो यक्ष कोण हेही ओळखू शकला नाही. मग इंद्र त्या यक्षाला जाणायला गेला. त्याक्षणी तो यक्ष अदृश्य झाला व त्या जागी अतिशय शोभायमान व सोन्यासारखी लखलखीत स्त्री दिसू लागली. तो यक्ष कोण होता, हे इंद्राने विचारल्यावर तिने उत्तर दिले की, " तो यक्ष म्हणजेच ब्रह्म होय. त्याच्या प्रभावानेच तुम्ही विजयी झालेला आहात, हे विसरू नका ! " ती सुवर्णकांती असणारी आदिशक्ती जगदंबा म्हणजेच उमा हैमवती होय. तिनेच पुढे इंद्रादी देवतांना ब्रह्मज्ञानोपदेश दिला. हीच भगवती उमा, मानव शरीरात कुंडलिनी रूपात पण सुप्त असते. ती श्रीसद्गुरूंच्या कृपेनेच जागृत होते आणि नंतर गुरूपदिष्ट मार्गाने साधना केल्यावर त्या साधकाला ब्रह्मानुभूती प्रदान करते; असे प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज स्पष्ट करतात. स्वत:च्या बळावर देवताही ब्रह्म जाणू शकत नाहीत. ते जाणण्यासाठी सद्गुरुरूपाने कृपा होऊन शक्ती जागृत व्हावीच लागते !
या भगवती आदिशक्तीलाच ' देवी ' म्हणतात. दीव्यति इति देवी । दिव् म्हणजे प्रकाशणे. ती स्वत:च्याच प्रकाशाने नित्य प्रकाशत असते, म्हणून तिला देवी म्हणतात. दिव् धातूचा आणखी एक अर्थ आहे खेळणे. ही जगज्जननी आदिजगदंबा, स्वत:च निर्माण केलेल्या अनंतकोटी ब्रह्मांडांमधील अगणित घडामोडींच्या रूपाने सतत क्रीडा करीत असते; या भगवतीचीच लीला सर्वत्र चालू असते, म्हणूनही तिला ' देवी ' असे संबोधले जाते !
उदो बोला उदो उदो सद्गुरुमाउलीचा वो ।
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
3 October 2016
॥ अमृतबोध ॥ ** जागर आदिशक्तीचा ** ३ ऑक्टोबर २०१६
Subscribe to:
Post Comments (Atom)
Total Pageviews
Translate
Followers
Popular Posts
-
शुभ दीपावली !! श्रीसंत तुकाराम महाराज म्हणतात, " जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी । तेणे पथ्ये सांभाळावी ॥ " या 'विठ्ठल मात्रे'...
-
नमस्कार मित्रहो, संतांची वचने ही दीपस्तंभासारखी असतात. महासागरात वाट चुकून भलतीकडे जाणा-या जहाजांना योग्य दिशा व योग्य मार्गावर ठेवण्य...
-
श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्र हे जवळपास गेली साडेपाच हजार वर्षे लाखो भक्तांकडून मनोभावे म्हटले जात आहे. आजवरच्या सर्व भक्तांकडून या स्तोत्र...
-
ग्रंथ हे गुरु असतात, पण मर्यादित अर्थाने. कारण ग्रंथांवरून होणारे ज्ञान जोवर आपल्या अनुभवाला येत नाही तोवर ते ज्ञान अपुरेच असते...
-
साधना 'निष्कामतेने' करायची असते : साधना 'निष्कामतेने' करायची म्हणजे काय ? साधना करण्याचा तात्पुरता ऐहिक असा काहीही फायदा नाह...
-
( श्रीदत्तसंप्रदायाचे अध्वर्यू योगिराज सद्गुरु श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांच्या २६ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त विशेष लेखमाला...
-
( श्रीदत्तसंप्रदायाचे अध्वर्यू योगिराज सद्गुरु श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांच्या २६ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त विशेष लेखमाला. ...
-
भक्ती ही श्रीगुरूंनी कृपापूर्वक प्रदान करावी लागते. श्रीसंत तुकाराम महाराजही सांगतात, " नवविधा काय बोलिली जे भक्ती । ती द्यावी माझे हा...
Blog Archive
-
▼
2016
(210)
-
▼
October
(31)
- ॥ अमृतबोध ॥ ३१ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ३० ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ २९ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ २८ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ २७ ऑक्टोबर २०१६ श्रीगुरुद्वादशी !!
- ॥ अमृतबोध ॥ २६ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ २५ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ २४ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ २३ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ २२ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ २१ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥२० ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ १९ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥१८ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥१७ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ १६ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ १५ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ १४ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ १३ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ १२ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ** जागर आदिशक्तीचा ** ११ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ * जागर आदिशक्तीचा * १० ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ** जागर आदिशक्तीचा ** ९ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ** जागर आदिशक्तीचा ** ८ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ** जागर आदिशक्तीचा ** ७ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ** जागर आदिशक्तीचा ** ६ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ** जागर आदिशक्तीचा ** ५ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ** जागर आदिशक्तीचा ** ४ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ** जागर आदिशक्तीचा ** ३ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ** जागर आदिशक्तीचा ** २ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ** जागर आदिशक्तीचा ** १ ऑक्टोबर २०१६
-
▼
October
(31)
0 comments:
Post a Comment