श्रीभगवंतांबद्दलचे निष्कलंक व निरपेक्ष प्रेम हे भक्ताचे व्यवच्छेदक लक्षणच आहे. ते परमप्रेम अंतरी दृढ वसत असल्यावर त्या भक्ताच्या प्रत्येक व्यवहारात, विचारांत, कृतीत ते उतरतेच; मुळात पाणी असले की झाड जसे पानाफुलांपर्यंत टवटवीत होते तसे. त्या प्रेमभक्तीचे वैशिष्ट्य सांगताना प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात की, श्रीभगवंतांच्या प्रेमाने अशी जी ओथंबलेली वाणी असते, तीच खरी वाणी होय. ते प्रेम नसेल तर ती वाणी मधुरच नाही !
प. पू. श्री. मामांच्या या बोधवाक्याचा गर्भितार्थही आहे. प. पू. श्री. शिरीषदादा कवडे यांनी सांगितलेल्या संदर्भांद्वारे तो विलक्षण अर्थ आपण आज आवर्जून जाणून घेऊया.
आज शारदीय पौर्णिमा, कोजागरी पौर्णिमा आहे. गांधीगिरीची फारच सवय असल्याने आपण या पौर्णिमेला 'कोजागिरी' करून टाकलेली आहे. मुळात ती 'कोजागरी' आहे. कोण जागे आहे? हे या रात्री भगवती लक्ष्मी पाहते व त्याच्यावर कृपा करते. पण हे जागेपण कोणते? हे मात्र संतांकडूनच जाणून घ्यायला हवे.
'शार' म्हणजे ज्ञान व ते ज्ञान जी देते ती 'शारदा'. ' ऋतु बरवा शारदु । ' अशा या शारदेच्या ऋतूतील ही शारदीय पौर्णिमा ज्ञानाची, स्फूर्तीची पौर्णिमा मानतात. या दिवशीचा चंद्रमा आपल्या किरणांतून अमृत पाझरतो. ते अमृत आपण आटीव दुधात पडलेल्या किरणांद्वारे मिळवून प्राशन करतो. या अमृताने आरोग्यलाभ तर होतोच पण ज्ञानलाभही होतो. भगवती शारदा हीच ज्ञानाची, वाणीची देवता. वाणी हे तिचे एक नामही आहे. म्हणून पू. मामा सांगत आहेत की, ज्या ज्ञानाच्या मुळाशी आधार म्हणून श्रीभगवंतांचे प्रेम नाही, ते ज्ञान निरुपयोगीच आहे. ते स्वत:चे व पर्यायाने जगाचेही शाश्वत कल्याण करू शकत नाही. ते कुठेतरी तोटाच करणार. जसे विज्ञानाने प्रगती खूप केली, जगणे सुसह्य केले; पण त्यानेच अणुबाँब देखील तयार केला ना? म्हणजे तेच ज्ञान विनाशकारीही झाले. आपल्या ज्ञानाचे असे होऊ नये म्हणून पू. मामा सांगतात की, तिथे श्रीभगवंतांचे प्रेम-अधिष्ठानच हवे ! या संपन्न जाणिवेचा आविष्कार आजच्या शारदीय पौर्णिमेच्या पर्वावर सर्वांच्या हृदयात होवो व याच भान-जागृतीने खरी कोजागरी साजरी होवो. तसेच भगवान श्रीहरींच्या कृपाचंद्राच्या प्रेमामृताचा लाभ 'अमृतबोध'च्या सर्व वाचकांना होवो, हीच याप्रसंगी सप्रेम शुभेच्छा !!
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
15 October 2016
॥ अमृतबोध ॥ १५ ऑक्टोबर २०१६
Subscribe to:
Post Comments (Atom)
Total Pageviews
Translate
Followers
Popular Posts
-
शुभ दीपावली !! श्रीसंत तुकाराम महाराज म्हणतात, " जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी । तेणे पथ्ये सांभाळावी ॥ " या 'विठ्ठल मात्रे...
-
॥ अमृतबोध ॥ संतांचे ' सांगणे ' फार मार्मिक असते. परिस्थितीचा पुरेपूर अंदाज त्यांच्या क्रांतदर्शी विचारांनी आधीच घेतलेला असतो. ...
-
नमस्कार मित्रहो, संतांची वचने ही दीपस्तंभासारखी असतात. महासागरात वाट चुकून भलतीकडे जाणा-या जहाजांना योग्य दिशा व योग्य मार्गावर ठेवण्य...
-
( श्रीदत्तसंप्रदायाचे अध्वर्यू योगिराज सद्गुरु श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांच्या २६ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त विशेष लेखमाला...
-
प. पू . सद्गुरु श्री. मामासाहेब देशपांडे महाराज यांच्या पुस्तकांसाठी - श्रीवामनराज प्रकाशन पुणे . ' श्रीगुरुकृपा ' , श्रीसंत ...
-
( श्रीदत्तसंप्रदायाचे अध्वर्यू योगिराज सद्गुरु श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांच्या २६ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त विशेष लेखमाला. ...
-
॥ अमृतबोध ॥ योगिराज सद्गुरु श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांच्या नित्य-चिंतनीय अशा ' अमृतबोध ' ग्रंथामधील प्रस्तुत उपदेश-वचन...
Blog Archive
-
▼
2016
(210)
-
▼
October
(31)
- ॥ अमृतबोध ॥ ३१ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ३० ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ २९ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ २८ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ २७ ऑक्टोबर २०१६ श्रीगुरुद्वादशी !!
- ॥ अमृतबोध ॥ २६ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ २५ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ २४ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ २३ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ २२ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ २१ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥२० ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ १९ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥१८ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥१७ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ १६ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ १५ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ १४ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ १३ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ १२ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ** जागर आदिशक्तीचा ** ११ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ * जागर आदिशक्तीचा * १० ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ** जागर आदिशक्तीचा ** ९ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ** जागर आदिशक्तीचा ** ८ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ** जागर आदिशक्तीचा ** ७ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ** जागर आदिशक्तीचा ** ६ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ** जागर आदिशक्तीचा ** ५ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ** जागर आदिशक्तीचा ** ४ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ** जागर आदिशक्तीचा ** ३ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ** जागर आदिशक्तीचा ** २ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ** जागर आदिशक्तीचा ** १ ऑक्टोबर २०१६
-
▼
October
(31)
0 comments:
Post a Comment