भक्ती हा शब्द खूपच प्रचलित असला तरी त्याचा खरा अर्थ फारच थोडे जाणतात. आपण जी काही करतो ती 'भक्ती' नसून 'उपासना' आहे. भक्ती 'करण्याची' गोष्टच नाही, ती तर 'कृपेने होण्याची' गोष्ट आहे ! शास्त्रांनी व संतांनी यावर सुरेख लिहून ठेवलेले आहे. सर्वांचे याबाबत एकमत आहे की, भक्ती ही प्राप्त व्हावी लागते आणि जोवर ती 'आम्ही करतो' ही भावना मनात आहे, तोवर ती कधीच प्राप्त होत नसते.
प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज आदिशक्तीची ही अद्भुत लीला फार सुंदर शब्दांत आपल्या ' अनादि निर्गुण प्रकटली भवानी ' या ग्रंथात सांगतात. आदिशक्ती भगवती कुंडलिनी श्रीगुरुकृपेने जागृत झाली की, प्रथम ती आपल्या मोहावर प्रहार करते. मोहाबरोबर सगळेच दोष जाऊन चित्ताची हळू हळू शुद्धी होते. पण मग ते रिकामे झालेले चित्त भरायला नको का पुन्हा? म्हणून भगवती शक्ती त्या शुद्ध होत असलेल्या चित्तात निखळ भगवद्प्रेमाचा एक एक बिंदू ठेवत जाते; हेच तिचे भक्ती प्रदान करणे होय!
अशी ही भक्ती जेव्हा श्रीगुरूंच्या कृपेने लाभते, तेव्हाच आपला खरा परमार्थ प्रवास सुरू होतो. भक्ती हेच शक्तीचे प्रत्यक्ष स्वरूप आहे. भगवान श्री माउलींनी भक्ती आणि शक्ती एकच असल्याचे उच्चरवाने सांगितलेले आहे. म्हणूनच नाथ संप्रदायात या दीक्षेला ' प्रेममुद्रा ' असे सार्थ नामाभिधान आहे. ही प्रेममुद्रा प्राप्त झाली की ती भक्ती नऊ प्रकारांनी आपल्या चित्तात प्रकट होते, हेच त्या आदिशक्तीचे खरे 'नवरात्र' होय. म्हणूनच श्रीगुरूंकडून जोवर ती शक्ती प्राप्त होत नाही, तोवर नवरात्रही यथार्थपणे साजरे होऊ शकत नाही !
ही प्रेममुद्रा प्राप्त होण्याची प्रक्रियाही पू. मामा छान समजावून सांगतात, ती आपण उद्या पाहू.
उदो बोला उदो उदो सद्गुरुमाउलीचा वो ।
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
8 October 2016
॥ अमृतबोध ॥ ** जागर आदिशक्तीचा ** ८ ऑक्टोबर २०१६
Subscribe to:
Post Comments (Atom)
Total Pageviews
Translate
Followers
Popular Posts
-
शुभ दीपावली !! श्रीसंत तुकाराम महाराज म्हणतात, " जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी । तेणे पथ्ये सांभाळावी ॥ " या 'विठ्ठल मात्रे'...
-
नमस्कार मित्रहो, संतांची वचने ही दीपस्तंभासारखी असतात. महासागरात वाट चुकून भलतीकडे जाणा-या जहाजांना योग्य दिशा व योग्य मार्गावर ठेवण्य...
-
श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्र हे जवळपास गेली साडेपाच हजार वर्षे लाखो भक्तांकडून मनोभावे म्हटले जात आहे. आजवरच्या सर्व भक्तांकडून या स्तोत्र...
-
ग्रंथ हे गुरु असतात, पण मर्यादित अर्थाने. कारण ग्रंथांवरून होणारे ज्ञान जोवर आपल्या अनुभवाला येत नाही तोवर ते ज्ञान अपुरेच असते...
-
साधना 'निष्कामतेने' करायची असते : साधना 'निष्कामतेने' करायची म्हणजे काय ? साधना करण्याचा तात्पुरता ऐहिक असा काहीही फायदा नाह...
-
( श्रीदत्तसंप्रदायाचे अध्वर्यू योगिराज सद्गुरु श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांच्या २६ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त विशेष लेखमाला...
-
( श्रीदत्तसंप्रदायाचे अध्वर्यू योगिराज सद्गुरु श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांच्या २६ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त विशेष लेखमाला. ...
-
भक्ती ही श्रीगुरूंनी कृपापूर्वक प्रदान करावी लागते. श्रीसंत तुकाराम महाराजही सांगतात, " नवविधा काय बोलिली जे भक्ती । ती द्यावी माझे हा...
Blog Archive
-
▼
2016
(210)
-
▼
October
(31)
- ॥ अमृतबोध ॥ ३१ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ३० ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ २९ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ २८ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ २७ ऑक्टोबर २०१६ श्रीगुरुद्वादशी !!
- ॥ अमृतबोध ॥ २६ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ २५ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ २४ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ २३ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ २२ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ २१ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥२० ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ १९ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥१८ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥१७ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ १६ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ १५ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ १४ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ १३ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ १२ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ** जागर आदिशक्तीचा ** ११ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ * जागर आदिशक्तीचा * १० ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ** जागर आदिशक्तीचा ** ९ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ** जागर आदिशक्तीचा ** ८ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ** जागर आदिशक्तीचा ** ७ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ** जागर आदिशक्तीचा ** ६ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ** जागर आदिशक्तीचा ** ५ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ** जागर आदिशक्तीचा ** ४ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ** जागर आदिशक्तीचा ** ३ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ** जागर आदिशक्तीचा ** २ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ** जागर आदिशक्तीचा ** १ ऑक्टोबर २०१६
-
▼
October
(31)
0 comments:
Post a Comment