19 October 2016

॥ अमृतबोध ॥ १९ ऑक्टोबर २०१६


रोज आपण अंघोळ करतो तेव्हा आपल्याला कसे स्वच्छ, छान वाटते. आपण ताजेतवाने होतो. आपली सगळी मरगळ, शिणवटा निघून जातो. ह्या लौकिक बाह्यशुद्धीचाच परिणाम इतका चांगला असतो; मग तीच शुद्धी आतूनही झाली तर? हेच काम साधना करते !
जसे पाणी बाहेरून शुद्धी करते, तसे श्रीगुरूंनी दिलेली साधना आपल्या अंत:करणाची आतून स्वच्छता करते. दिवसभरातील राग, द्वेष, निंदा, नकारात्मक विचार, हेवेदावे, दु:खे, विकार इत्यादी अनंत गोष्टींमुळे मन, बुद्धी व चित्तात साचलेला मळ साधनेने त्वरित स्वच्छ होतो व आपण आतूनही ताजेतवाने होतो. साधना ही अंत:करणाची अंघोळच आहे !  मोबाईलवरील अॅप्लिकेशन वापरून जंक क्लीन केले की, जसा मोबाईल फास्ट होतो, अधिक कार्यक्षम होऊन जोमाने काम करू लागतो; तेच साधनेने इथेही होते.
म्हणून प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज सांगतात की, दैनंदिन व्यवहारामध्ये आपण उगीचच आपल्या अंत:करणात साठवलेली ही अनावश्यक घाण स्वच्छ होण्यासाठी, आपली दररोजची साधना प्रेमाने व नेमाने झालीच पाहिजे !
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:

Post a Comment

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Blog Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates