भक्ती ही श्रीगुरूंनी कृपापूर्वक प्रदान करावी लागते. श्रीसंत तुकाराम महाराजही सांगतात, " नवविधा काय बोलिली जे भक्ती । ती द्यावी माझे हाती संतजनीं ॥ " यावर मिश्किल पण फार मार्मिक टिप्पणी करताना पू. मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात, " संतजनांनी ' माझ्या हाती भक्ती द्यावी ' याचा अर्थ काय? भक्ती काय हातात द्यायची वस्तू आहे? तो काय लाडू वगैरे आहे? तर तसे नाही. याचा गूढ अर्थ ' कानात उपदेश करून शक्ती द्यावी ' असा आहे. भक्ती म्हणजेच प्रेममुद्रा. हे जे प्रेम आहे, ते अमृतस्वरूप होण्याचे आहे. श्रीगुरूंकडून शक्ती जागृत झाल्यावर साधकाने प्रेमाने साधना केल्यावर तो अमृतस्वरूप होतो, तृप्त होतो !"
शिष्याची तीव्र तळमळ पाहून, श्रीगुरु त्याच्या कानात एका शब्दाचा उच्चार करतात. म्हणजेच त्याला शक्तियुक्त नाम, परंपरेने आलेले सिद्धनाम देतात. शिष्य त्या नामाचा उच्चार, जसा श्रीगुरूंनी करायला सांगितलाय तसाच पुन्हा पुन्हा करू लागला की, हळूहळू त्याचा वासनाक्षय होतो व त्याला भक्तीची प्राप्ती होते. असा थोडा का होईना, पण वासनाक्षय झाल्याने श्रीभगवंतांविषयी प्रेम वाटू लागते व मनाला त्याची गोडी लागली की तीच भक्ती; श्रवण, कीर्तन, स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य व आत्मनिवेदन या नऊ रूपांनी प्रकट होऊन हळूहळू त्या साधकाचा पूर्ण वासनाक्षय करते. इंद्रियांना व मनाला भगवद्भक्तीची अशी नवविध गोडी लागल्यावर, विषयांचे जे ध्यान मनास असते ते संपुष्टात येते. तो याच सर्व प्रकारांनी श्रीभगवंतांबरोबरच आपल्या श्रीगुरूंचीही भक्ती करू लागतो. मग त्या भक्तीच्या आवेशामुळे त्याचे अज्ञान व वासना जळून खाक होतात. सतत श्रीभगवंतांच्या लीलांचे चिंतन करण्याने, त्याचे मन व शरीरही त्या लीलांचे अनुकरण करू लागते. त्यामुळे मग तो सर्व बंधनांमधून मुक्त होतो व भगवद्स्वरूपच होऊन ठाकतो !
उदो बोला उदो उदो सद्गुरुमाउलीचा वो ।
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
9 October 2016
॥ अमृतबोध ॥ ** जागर आदिशक्तीचा ** ९ ऑक्टोबर २०१६
Subscribe to:
Post Comments (Atom)
Total Pageviews
Translate
Followers
Popular Posts
-
शुभ दीपावली !! श्रीसंत तुकाराम महाराज म्हणतात, " जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी । तेणे पथ्ये सांभाळावी ॥ " या 'विठ्ठल मात्रे...
-
नमस्कार मित्रहो, संतांची वचने ही दीपस्तंभासारखी असतात. महासागरात वाट चुकून भलतीकडे जाणा-या जहाजांना योग्य दिशा व योग्य मार्गावर ठेवण्य...
-
॥ अमृतबोध ॥ आज आषाढी एकादशी, महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या व अलौकिक संप्रदायाचा सर्वात मोठा महोत्सव. वारकरी संप्रदाय हा सर्वात शहाणा स...
-
ग्रंथ हे गुरु असतात, पण मर्यादित अर्थाने. कारण ग्रंथांवरून होणारे ज्ञान जोवर आपल्या अनुभवाला येत नाही तोवर ते ज्ञान अपुरेच असते...
-
॥ अमृतबोध ॥ योगिराज सद्गुरु श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांच्या नित्य-चिंतनीय अशा ' अमृतबोध ' ग्रंथामधील प्रस्तुत उपदेश-वचन...
-
( श्रीदत्तसंप्रदायाचे अध्वर्यू योगिराज सद्गुरु श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांच्या २६ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त विशेष लेखमाला. ...
-
॥ अमृतबोध ॥ ॥ हरिपाठ मंजिरी - २०० ॥ श्रीसंत मामासाहेब देशपांडे महाराज सांगतात, परिसालाच फक्त लोखंडाचे सोने करता येते. परंतु असे लोखंडाचे झा...
Blog Archive
-
▼
2016
(210)
-
▼
October
(31)
- ॥ अमृतबोध ॥ ३१ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ३० ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ २९ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ २८ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ २७ ऑक्टोबर २०१६ श्रीगुरुद्वादशी !!
- ॥ अमृतबोध ॥ २६ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ २५ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ २४ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ २३ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ २२ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ २१ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥२० ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ १९ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥१८ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥१७ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ १६ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ १५ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ १४ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ १३ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ १२ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ** जागर आदिशक्तीचा ** ११ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ * जागर आदिशक्तीचा * १० ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ** जागर आदिशक्तीचा ** ९ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ** जागर आदिशक्तीचा ** ८ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ** जागर आदिशक्तीचा ** ७ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ** जागर आदिशक्तीचा ** ६ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ** जागर आदिशक्तीचा ** ५ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ** जागर आदिशक्तीचा ** ४ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ** जागर आदिशक्तीचा ** ३ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ** जागर आदिशक्तीचा ** २ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ** जागर आदिशक्तीचा ** १ ऑक्टोबर २०१६
-
▼
October
(31)
0 comments:
Post a Comment