
सद्गुरु श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांनी केलेले, भगवान श्री माउलींच्या हरिपाठातील *"साधुबोध जाला तो नुरोनिया ठेला ।"* या सहाव्या अभंगाचे विवरण आपण पाहात आहोत. "साधू कोणाला म्हणावे?" याचे पू.मामा सखोल विवेचन करीत आहेत. साधुत्वाच्या कसोट्या ते मुद्दामच एवढ्या विस्ताराने सांगत आहेत; कारण अशा साधूंनी...