Read More

प. पू. सद्गुरु श्री मामासाहेब देशपांडे महाराज

31 October 2016

॥ अमृतबोध ॥ ३१ ऑक्टोबर २०१६

श्रीसद्गुरूंनी कृपावंत होऊन अनुग्रह करणे, हा नवीन जन्मच असतो अापला. या कृपेसाठी पूर्वपुण्याईची नितांत आवश्यकता असते. त्या पुण्याईचे फळ म्हणून श्रीगुरूंची कृपा होणे म्हणजेच ' योग ' होय. योग होणे याचा अर्थ जोडले जाणे. श्रीगुरुकृपेने तो जीव श्रीभगवंतांशी जोडला जातो. असा योग झाल्यानंतर श्रीगुरूंनी दिलेली...
Read More

30 October 2016

॥ अमृतबोध ॥ ३० ऑक्टोबर २०१६

प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज ' विठ्ठल मात्रा ' या शब्दाचा अर्थ ' दीक्षा ' असा करतात. आता ते त्या दीक्षा शब्दाचे फार अर्थपूर्ण मर्म सांगतात की, " दीक्षा म्हणजे वासनांवर पडलेला स्फुल्लिंग ". समजा एक कापसाचा मोठा ढीग आहे, त्याच्यावर छोटीशी ठिणगी पडली तर? तो संपूर्ण ढीग काही क्षणातच भस्म होऊन...
Read More

29 October 2016

॥ अमृतबोध ॥ २९ ऑक्टोबर २०१६

शुभ दीपावली  !! श्रीसंत तुकाराम महाराज म्हणतात, " जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी । तेणे पथ्ये सांभाळावी ॥ " या 'विठ्ठल मात्रे'चे यथार्थ स्वरूप सांगताना प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात, " ' विठ्ठल मात्रा ' म्हणजेच दीक्षा. ज्याला ती मात्रा घेऊन मोक्षरूपी गुण अनुभवायचा आहे, त्याने साधनेची...
Read More

28 October 2016

॥ अमृतबोध ॥ २८ ऑक्टोबर २०१६

कोणत्याही रोगावरील औषध जर उत्तमरित्या व त्वरित लागू पडायला हवे असेल, तर त्याबरोबर त्याची पथ्ये पण पाळावीच लागतात. तसेच भवरोगावरील साधनारूपी औषध लागू पडायला हवे असेल, तर त्याचीही काही पथ्ये पाळायला नकोत का? त्यासंदर्भात प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज साधकांसाठी फार मार्मिक उपदेश करत आहेत. साधकांनी...
Read More

27 October 2016

॥ अमृतबोध ॥ २७ ऑक्टोबर २०१६ श्रीगुरुद्वादशी !!

भगवान श्रीशिवशंकर तांडवनृत्य करतात. त्यांच्या तांडवाने सर्व पृथ्वी गदगदा हालते आणि जगाचा -हास होतो. म्हणजेच संपूर्ण जग लयाला जाते. आपल्या श्रीसद्गुरूंनी दिलेली साधना हेही एक प्रकारचे भगवान आदिनाथांचे तांडवनृत्यच आहे. त्या तांडवाने जसा जगाचा नाश होतो, तसा या तांडवाने आपल्या वासनांचा समूळ नाश होतो;...
Read More

26 October 2016

॥ अमृतबोध ॥ २६ ऑक्टोबर २०१६

आयुर्वेदानुसार आपले शरीर सात धातूंचे बनलेले आहे. रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र या सात धातूंपासून संपूर्ण शरीर बनते. या धातूंच्या कमी अधिक प्रमाणानुसार शरीराचे आरोग्य ठरते. जे धातू पुष्ट असतात त्यांची लक्षणे आपल्या शरीरावर स्पष्ट दिसतात. या धातूंवरच शरीराचे व मनाचेही स्वास्थ्य अवलंबून...
Read More

25 October 2016

॥ अमृतबोध ॥ २५ ऑक्टोबर २०१६

प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांनी सांगितलेले साधकांचे चार शत्रू व चार मित्र आपण पाहिले. आता साधकांसाठी ते चार कल्याणप्रद गोष्टी सांगत आहेत. अल्प आहार, अल्प निद्रा, नियमित साधना व संयमित विचारपूर्ण बोलणे; या चार गोष्टींचे प्रत्येक साधकाने मनापासून पालन करणे हिताचे असते. अल्प या शब्दाचा अर्थ...
Read More

24 October 2016

॥ अमृतबोध ॥ २४ ऑक्टोबर २०१६

भगवान श्री ज्ञानेश्वर माउली, सखा कसा असावा? हे सांगताना म्हणतात की, " जो आघवियाची भूमिका । सवे चाले ॥ " जो आपल्या प्रत्येक बाबतीत, सुख-दु:ख, हालअपेष्टा, समाधान, आनंद अशा प्रत्येक परिस्थितीत कायम आपल्या सोबतच असतो, तो सखा, खरा मित्र होय. आपल्या आयुष्यात त्याचा आधार नि:संशय फार महत्त्वाचा व हिताचाच असतो....
Read More

23 October 2016

॥ अमृतबोध ॥ २३ ऑक्टोबर २०१६

श्रीसंत तुकाराम महाराज म्हणतात, " रात्रंदिन आम्हां युद्धाचा प्रसंग । अंतर्बाह्य जग आणि मन ॥ " प्रत्येक साधकाला या युद्धाची सतत अनुभूती येतच असते. बाहेरचे शत्रू परवडले पण आतले फार भयंकर. ते हिताचे नसून शत्रू आहेत, हेच कळायला खूप उशीर होतो. साधकाने नेहमी सावध असावे, असे संत म्हणतात ते यासाठीच. साधकाच्या...
Read More

22 October 2016

॥ अमृतबोध ॥ २२ ऑक्टोबर २०१६

अनुभूती ही अतिशय दुर्मिळ गोष्ट असल्याने त्यासाठी साधनाही तितक्याच प्रमाणात करावी लागते आणि आपण जात्याच अधीर असतो. दम धरण्याची, सबूरीची आपल्याला सवयच नसते. आपली गोष्ट त्या माकडासारखी असते. झाड लावले की मूळ किती वाढले, हे पाहण्यासाठी ते माकड रोज झाड उपटून पाहते.  म्हणूनच थोडी साधना झाली आणि काहीच...
Read More

21 October 2016

॥ अमृतबोध ॥ २१ ऑक्टोबर २०१६

आपण सर्वजण, हे दिसणारे, जाणवणारे जग, यच्चयावत् सगळे काही मायेचाच खेळ आहे. कल्पना हे मायेचे दृश्य रूप, कारण ती स्वत:च कल्पना आहे. म्हणून आपल्याला सतत काही ना काही कल्पना करायची दांडगी सवयच असते. झोपेत सुद्धा आपण कल्पनेचे इमले रचतो, इतकी ही कल्पना मुरलेली आहे आपल्यात. तसेच या वैष्णवी मायेच्या कक्षेत...
Read More

20 October 2016

॥ अमृतबोध ॥२० ऑक्टोबर २०१६

श्रीभगवंतांची प्राप्ती होणे, हेच मनुष्यजन्माचे सर्वश्रेष्ठ सुफल आहे. कारण चौ-याऐंशी लक्ष जीवयोनींपैकी केवळ याच एका योनीत, मनुष्यजन्मातच बुद्धीचे विशेष वरदान असल्याने श्रीभगवंत जाणले जाऊ शकतात. पण; ही खूप कठीण व अशक्यप्राय गोष्ट साधेल कशी? काय काय विघ्ने समोर येतील? नक्की जमेल का आपल्याला एवढे? अशा...
Read More

19 October 2016

॥ अमृतबोध ॥ १९ ऑक्टोबर २०१६

रोज आपण अंघोळ करतो तेव्हा आपल्याला कसे स्वच्छ, छान वाटते. आपण ताजेतवाने होतो. आपली सगळी मरगळ, शिणवटा निघून जातो. ह्या लौकिक बाह्यशुद्धीचाच परिणाम इतका चांगला असतो; मग तीच शुद्धी आतूनही झाली तर? हेच काम साधना करते ! जसे पाणी बाहेरून शुद्धी करते, तसे श्रीगुरूंनी दिलेली साधना आपल्या अंत:करणाची आतून स्वच्छता...
Read More

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

64,049

Translate

Followers

Popular Posts

Blog Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © 2025 Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates