Read More

प. पू. सद्गुरु श्री मामासाहेब देशपांडे महाराज
Read More

प. पू. सद्गुरु श्री मामासाहेब देशपांडे महाराज
Read More
प. पू. सद्गुरु श्री मामासाहेब देशपांडे महाराज
Read More
प. पू. सद्गुरु श्री मामासाहेब देशपांडे महाराज
Read More
प. पू. सद्गुरु श्री मामासाहेब देशपांडे महाराज
Read More
प. पू. सद्गुरु श्री मामासाहेब देशपांडे महाराज

30 June 2017

*॥ अमृतबोध ॥* *३० जून २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १९३॥*

सद्गुरु श्री माउली हरिपाठाच्या नवव्या अभंगातील पहिल्या चरणाच्या उत्तरार्धात म्हणतात, *"रामकृष्णीं पैठा कैसेनि होय ॥हरि.९.२॥"*
या चरणाच्या विवरणात प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज नामस्मरणाच्या संदर्भातला अत्यंत महत्त्वाचा व फारसा कुठेही न आलेला एक मौलिक सिद्धांत स्पष्ट करून सांगतात.
पू.मामा म्हणतात, "असा नियम आहे की, मूळ *'ॐ तत् सत्'* हे तत्त्व आहे, अगर मूळ मंत्र आहे. माउलींनी त्याचेच स्वरूप असणारा *'रामकृष्ण हरि'* हा भागवतधर्माचा महामंत्र म्हणून ठरवला. कारण मूळ मंत्रातील 'राम' हेच अक्षर ॐकारस्वरूप आहे. हेच श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनीही आपल्या वाणी व काव्यातून सिद्ध केलेले आहे. दुसरे अक्षर 'तत्' हे कृष्णस्वरूप आहे व तिसरे अक्षर 'सत्' हे हरिस्वरूप आहे.
हेच त्रयोदशाक्षरी मंत्रातही आहे. 'श्रीराम' हे ॐकारस्वरूप, 'जयराम' हे तत्कारस्वरूप व 'जय जय राम' हे सत्कारस्वरूप आहे; हे प्रत्यक्ष मारुतीरायांनी सर्वांना पटवून दिल्याचे पुराणांतरी प्रसिद्ध आहे.
यावरून *'रामकृष्णीं पैठा कैसेनि होय ॥'* याची संगती प.पू.मामा लावतात, ती आपण उद्या सविस्तर पाहू.
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

Read More

29 June 2017

*॥ अमृतबोध ॥* *२९ जून २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १९२ ॥*

श्रीराम व श्रीकृष्ण हे भिन्न नाहीत. ते एकाच श्रीविष्णूंचे अवतार असून, कार्य पूर्ण झाले की पुन्हा त्या विष्णूंप्रतच जातात. हेच माउली अभंगाच्या दुस-या चरणात सांगतात की,
*"उपजोनि करंटा नेणें अद्वय वाटा ।*
*रामकृष्णीं पैठा कैैसेनि होय ॥हरि.९.२॥"*
याचे विवरण करताना प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात की, प्राणिमात्र या जगात जन्मास येतो; म्हणजेच उपजतो. परंतु त्यास जर आल्याची वाट माहीत नसेल, तर अशा प्राण्याला माउली 'करंटा' म्हणतात.
व्यवहारात करंटा कोणास म्हणतात? तर ज्याला द्रव्य मिळवण्याची अक्कल नाही व जर चुकून बापाची इस्टेट हाती आली, तर ती व्यसनांपायी उधळपट्टी करून ज्यास दारिद्र्य येते, त्याला 'करंटा' असे म्हणतात.
म्हणूनच म्हण पडली आहे की, *प्रपंचात वित्त व परमार्थात चित्त चांगले स्थिर पाहिजे.* कारण वित्ताने प्रपंच उत्तम करून जगात वाहवा मिळते व चित्ताने हे सर्व विष्णुमय आहे, असे चिंतन झाल्यावर परमार्थात श्रेष्ठ अवस्था प्राप्त होते. असे झाले तरच तो 'ज्ञानी' म्हटला जातो व हे नाही झाले तर तो 'करंटा' ठरतो. *कारण अद्वैताची वाट सापडल्याशिवाय, विष्णू हे सर्वव्यापी तत्त्व आहे हे कळणार नाही.* आणि असे झाले तर की काय होईल? तेच माउली कडव्याच्या उत्तरार्धातून सांगतात. ते आपण उद्या पाहू. 
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

Read More

28 June 2017

*॥ अमृतबोध ॥* *२८ जून २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १९१ ॥*

हरिपाठाच्या नवव्या अभंगात सद्गुरु श्री माउली म्हणतात की, सर्वव्यापी तत्त्वाचे ज्ञान झाल्याशिवाय केलेला जप व्यर्थ होय. तसेच एकदेशीय जपज्ञान किंवा माहात्म्यज्ञान हेही व्यर्थच म्हणायला हवे. असा अर्थ कशावरून काढला? प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज सांगतात, पहिल्या चरणाच्या उत्तरार्धात माउली स्वत:च तसे सूचित करतात की, *"रामकृष्णीं मन नाही ज्याचें ॥हरि.९.१॥"*
राम हा अलग, कृष्ण हा अलग व पंढरीचा पांडुरंग हा अलग; असे मानणारे वादविवाद करत बसतात. त्यांना तो खुशाल घालू द्यावा, आपण मात्र समजावे की, सर्व विष्णूंचेच अवतार अाहेत.
कारण साधकाच्या ठिकाणी हे माहात्म्यज्ञान कधीच एकदेशी नसावे. सर्वव्यापक तत्त्व एकच आहे ना, त्याशिवाय सर्वव्यापी कसे ठरणार ते? म्हणून आपण हा भेद कधीच बाळगू नये, असा पू.मामा आपल्याला मन:पूर्वक उपदेश करतात.
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

Read More

27 June 2017

*॥ अमृतबोध ॥* *२७ जून २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १९० ॥*

भगवान श्री वामनांनी, "तिसरे पाऊल कुठे ठेवू?" असे विचारल्यावर, बली राजाने आपले मस्तक झुकवले व त्यावर पाऊल ठेवायची विनंती केली. कारण बली हा ज्ञानीभक्त होता. मी देह नसून देही आहे, हे तो यथार्थ जाणत होता. पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश या पंचमहाभूतांपासून देह बनलेला आहे; तर त्या देहात नांदणारा, त्या देहातील देही जो जीव, तो तर ब्रह्माचाच अंश असल्याने तो कधीच त्या देहात विलीन होऊ शकत नाही. तेव्हा भगवंतांनी सबंध सृष्टी जरी व्यापली तरी ती केवळ पांचभौतिक असल्याने ते देह व्यापतील. पण ते हा बलीरूप जीव नाही व्यापणार. म्हणूनच मग त्या बलीने वामनरूपी विराट पुरुषापुढे शिर झुकवले व "ठेवा माझ्या मस्तकावर पाय !" असे जाणीवपूर्वक सांगितले.
जगाच्या पांचभौतिक तत्त्वांशी देहाचा संबंध आहे; परंतु जीवाचा संबंध ब्रह्माशी आहे. कारण "जीवो ब्रह्मैव नापर: ।" असा सिद्धांतच आहे. अशा या सर्वव्यापी तत्त्वाचे अर्थात् विष्णुरूपाचे ज्ञान झाल्याशिवाय केलेला जप हा व्यर्थ समजावा लागेल.
सद्गुरु श्री माउलींच्या *"विष्णुवीण जप व्यर्थ त्याचे ज्ञान ।"* या चरणाचा असा अभिनव गूढार्थ प.पू.श्री.मामा सविस्तर समजावून सांगतात.
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

Read More

26 June 2017

॥ अमृतबोध ॥२६ जून २०१७॥ हरिपाठ मंजिरी - १८९ ॥

सद्गुरु श्री माउली हरिपाठाच्या नवव्या अभंगाच्या पहिल्या चरणात म्हणतात की, "विष्णुवीण जप व्यर्थ त्याचे ज्ञान ।" याचा गूढार्थ सांगण्यासाठी प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज श्रीभगवंतांच्या श्री वामन अवताराचे उदाहरण घेतात.
बटू वामन बलीच्या यज्ञाच्या ठिकाणी आले. त्यांनी बलीकडे तीन पावले जमीन मागितली. ती मिळताच, एका पावलात सप्त स्वर्ग व्यापले,  दुस-या पावलात सप्त पाताळ व्यापल्यावर, 'तिसरे पाऊल कोठे ठेवू?' म्हणून विचारले.
बलीराजा पण काही कमी कमी नव्हता. भक्तश्रेष्ठ प्रल्हादांचा परम भगवद्भक्त असा नातूच होता तो. त्याला माहीत होते की, प्रत्येक मानवाच्या देहात जीवरूपाने देवच असतात. असे ज्याला कळते, तोच खरा मानव होय. परंतु भ्रमाने मनुष्य 'मी म्हणजे देह' असे म्हणतो. पण बलीचे तसे नव्हते. त्याला हे ज्ञान असल्यामुळेच त्याने भगवंतांच्या प्रशनाचे सुयोग्य उत्तर दिले. त्याने भगवान वामनांना आपल्या मस्तकावर तिसरे पाऊल ठेवायला सांगितले.
प.पू.श्री.मामा बलीच्या या कृतीमागील कारणही फार सुंदर समजावून सांगतात. ते आपण उद्या पाहू.
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
Read More

25 June 2017

*॥ अमृतबोध ॥* *२५ जून २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १८८ ॥*

*प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज जयंती  !!*

प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज सद्गुरु श्री माउलींच्या हरिपाठातील नवव्या अभंगाची प्रस्तावना करताना म्हणतात, "सद्गुरु श्रीसंत ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठातील हा मोठा गोड अभंग आहे. तसे पाहिले तर, सर्वच अभंग एकापेक्षा एक असे वरचढ अाहेत. परंतु असे असले तरी, प्रत्येक अभंगाचे काही ना काही तरी वैशिष्ट्य आहेच. त्यांपैकी या अभंगाचे वैशिष्ट्य फार मोलाचे आहे. ते काय व कसे आहे? तेच आपण आता माउलींच्या कृपेने पाहणार आहोत.
या अभंगाच्या पहिल्या चरणात माउली म्हणतात, *"विष्णुवीण जप व्यर्थ त्याचें ज्ञान । रामकृष्णीं मन नाही ज्याचें ॥हरि.९.६॥"*
विष्णू शब्दाचा अर्थ प्रथम समजायला हवा. 'विष्णू' या शब्दाचा अर्थच 'व्यापून राहणारा, सर्वव्यापी' असा असल्यामुळे, तो सर्वांना व्यापून दशांगुळे उरला असे श्रुती सांगते.
आपल्याकडे जे पुराणांमधून वर्णिलेले दशावतार आहेत, ते विष्णूंनीच घेतलेले आहेत. यात एक लक्षात ठेवायला हवे की, इकडे अवतारकार्य चालू असताना, तिकडे क्षीरसागरात शेषशायी भगवान श्रीविष्णू नाहीत; असे कधी होत नसते."
पू.मामांचे हे सांगणे आपण उद्या एका अवताराचे उदाहरण घेऊन समजून घेऊया.
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

Read More

24 June 2017

*॥ अमृतबोध ॥* *२४ जून २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १८७ ॥*

हरिपाठाच्या नवव्या अभंगाचा उर्वरित सरलार्थ सांगताना प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात, "श्रीसद्गुरूंच्या उपदेशावाचून ज्ञान होणार नाही; आणि त्या ज्ञानाशिवाय द्वैतभ्रांती जाणार नाही. अपरोक्ष ज्ञानानुभव होण्यासाठी ईश्वराच्या सगुण-स्वरूपाचे नित्य ध्यान जडले पाहिजे. तसेच मी-तू पणाची सर्व भाषा संपून, अखंड नामस्मरणाची गोडी लागली पाहिजे; असे श्री ज्ञानेश्वर महाराज येथे स्पष्ट सांगतात. "
मी (जीव) आणि परमात्मा यात असणारा भेद ज्ञानाशिवाय नष्ट होत नसतो व हे ज्ञान सद्गुरुकृपेवाचून कधीच होत नाही. आपल्या चित्ताला आधी ईश्वराच्या सगुण साकार रूपाचे अखंड ध्यान जडले पाहिजे. तसेच सतत नामस्मरणही घडले पाहिजे. त्यामुळे मी-तू पणाची अर्थात् द्वैताची भावनाच नष्ट होते; आणि त्यातूनच मग  अपरोक्षानुभूती प्रकट होत असते. असा अनुभूतीचा क्रम सद्गुरु श्री माउली या अभंगातून सांगतात.
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

Read More

23 June 2017

॥ अमृतबोध ॥२३ जून २०१७॥ हरिपाठ मंजिरी - १८६ ॥

सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज हरिपाठाच्या नवव्या अभंगात दुर्दैवी अभक्तांविषयी खेद व्यक्त करतात.
या अभंगाचा सरलार्थ सांगताना प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात, "कितीही ज्ञानी असला तरी, महाविष्णू श्रीहरींच्या रामकृष्णादी सगुण अवतारांच्या लीला गाण्यात आणि त्यांचे नामस्मरण करण्यात ज्यांचे मन रंगले नाही, त्यांचे ते सर्व ज्ञान व्यर्थ आहे. सगुण उपासनेेने अद्वैत-ज्ञानसिद्धी करून घेण्याचा हा मार्ग ज्याला पटला नाही, तो जन्माला  येऊन कमनशिबाचाच म्हटला पाहिजे. कारण अशाने त्याला भगवत्प्राप्ती कशी होणार?"
ज्याला हरिभक्तीची ओढ नाही, तो कितीही मोठा ज्ञानी असला तरी त्याचे ते ज्ञान शाश्वत आनंदासाठी काहीही फायद्याचे ठरत नाही. म्हणूनच ते सर्व ज्ञान व्यर्थच म्हटले पाहिजे. सगुण श्रीहरींच्या लीला गाणे व त्यांचे नामस्मरण करणे, हे अद्वैतज्ञान प्राप्त होण्याचे मार्ग आहेत. हेच त्या दुर्दैवी जीवाला पटत नाहीत, म्हणून एकप्रकारे तो कमनशिबीच ठरतो. कारण एवढा दुर्लभ असा नरजन्मच तो व्यर्थ गमावतो.
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
Read More

22 June 2017

॥ अमृतबोध ॥ २२ जून २०१७

सर्वत्र दुर्लभ असणारे नाम खरेतर सुलभ असल्याचा अनुभव कसा येतो, हे सांगताना प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात, "श्रीगुरूंची सेवा करून, त्यांच्याकडून ते शक्तियुक्त, दुर्लभ नाम मिळते. मग प्रेमाने, श्रद्धेने व आदराने साधना झाल्यावर, तेच नाम किती सुलभ आहे याचा अनुभव येतो. इतकेच नाही तर ते घ्यावेही लागत नाही, पुढे पुढे तर त्याचे नुसते श्रवण करूनही तृप्ती लाभते. म्हणूनच माउली म्हणतात की, "येथ मोक्ष असे आयता । श्रवणाचिमाजि ॥ज्ञाने.४.४२.२२४॥" 
यासाठीच संतसंगतीने व त्यांच्या कृपेने, त्यांनी सांगितल्याप्रमाणे वागले असता; सहजच 'श्रीहरी आकलन होतो', असे श्री माउलींचे सांगणे आहे !
प्रेमाने, श्रद्धेने व आदराने साधना घडली की मगच नामाची सुलभता अनुभवाला येते, असे पू.मामा म्हणतात. त्याचा आपण गांभीर्याने विचार करूनच साधना करायला हवी.
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
Read More

21 June 2017

*॥ अमृतबोध ॥* *२१ जून २०१७* *॥ अमृतबोध-वर्षपूर्ती ॥*

प.पू.सद्गुरु श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांच्या असीम दयाकृपेने, गेल्यावर्षी २१ जून रोजी *॥ अमृतबोध ॥* पोस्ट करायला सुरुवात झाली. सद्गुरुकृपेने आज या सेवेला एक वर्ष पूर्ण होत आहे. गेल्या वर्षभरात केवळ दोन दिवस सोडता सातत्याने अमृतबोध पोस्ट झाले, ही देखील सद्गुरूंची कृपाच होय.
आजवर अनेकानेक वाचकांनी भरभरून प्रतिसाद दिला, प्रतिक्रिया दिल्या, आवडल्याचे आवर्जून सांगितले. अमृतबोधातून प्रकट होणारे बोधामृत हे पूर्णपणे सद्गुरु श्री मामांचेच कृपापसाय असल्याने, त्याचा लाभ सर्वांना आजवर झाला आणि पुढेही यावच्चंद्रदिवाकरौ होतच राहील. कारण, संतांच्या वचनांना त्यांच्या तपसामर्थ्याचे अधिष्ठान असल्याने, परिणाम शाश्वत असतो, अक्षय असतो. म्हणूनच ती खरी 'अमृत-वचने' होत. ही विलक्षण बोधवचने वाचकांना, चिंतकांना सर्वांगाने अमृतमय करण्याचे अपूर्व सामर्थ्यही त्यामुळेच सहजतेने अंगी वागवीत असतात. सद्गुरु श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांच्या कृपेने *॥ अमृतबोध ॥* चा प्रवास सतत चालूच राहील, याची आम्हांला खात्री आहे व तो चालू राहावा अशीच त्यांच्या चरणीं सर्वांच्या वतीने प्रार्थनाही आहे !
गेल्यावर्षी फेसबुक व व्हॉटसअप वर आपण ह्या पोस्ट करायला सुरुवात केली. तेव्हापासून फेसबुकवरील "सद्गुरुबोध" या आपल्या पेजच्या २५०० पेक्षा जास्त लाईक्स झालेल्या असून, "सद्गुरुबोध" ब्लॉगला जगभरातून २५ हजार हिटस् आहेत. ही सर्व सद्गुरूंचीच कृपा आहे. हा प्रतिसाद दिवसेंदिवस वाढतोच आहे.
एका पत्रात सद्गुरु श्री.मामा आपल्या एका साधकाला उपदेश करताना फार मार्मिक सांगतात की, *"तुझे सतत संकटांमधून रक्षण व्हावे यासाठी मी देवांना वारंवार साकडे घालावे, अशी तुझी इच्छा दिसते. एक तर देवांवर जडभार घालू नये, या मताचा मी आहे. दुसरे म्हणजे, सुखदु:ख हे आपल्याच प्रारब्धयोगाने येत असते. त्यासाठी देव कशाला मध्ये घालावेत? देवांनी एकदा आपला स्वीकार केला की, ते आपली सद्बुद्धी शाबूत ठेवतात; हीच त्यांची कृपा समजायला हवी. महाभारत ग्रंथातही असेच म्हटले आहे की; "देव, देवता काही गुराख्याप्रमाणे हातात दंड घेऊन कोणाचे रक्षण करीत नाहीत, तर ज्याचे रक्षण करण्याची ते इच्छा करतात त्याला ते उत्तम प्रकारची बुद्धी देतात !" म्हणून देव आणि सद्गुरु यांच्याबद्दल नेहमी हेच सत्य मानून, तशी भावना ठेवणे हिताचे आहे. अन्यथा आपणाकडून विपरीत भावनेने घोर अपराध घडू लागण्यास वेळ लागायचा नाही."*
सद्गुरु श्री.मामांचा हा अलौकिक बोध हृदयावर कोरून ठेवावा इतका महत्त्वाचा आहे. अशीच श्रीकृपेने लाभलेली सद्बुद्धी सदैव जागृत राहून तिने आपले सर्वबाजूंनी संरक्षण करावे; हाच आपल्या या *॥ अमृतबोध ॥* उपक्रमामागचा मुख्य उद्देश आहे. श्रीभगवंतांच्या दयेने आपल्याला लाभलेल्या दुर्लभ सद्बुद्धीचा स्फुल्लिंग सतत तेजाळता राहावा, यासाठीच हा बोध-उपक्रम आहे. 
आपणां सर्व वाचकांचे सहकार्य असेच चढत्या-वाढत्या प्रमाणात मिळत राहो याच सदिच्छेसह; अमृतबोध परिवार व तुम्हां वाचकांच्या वतीने, वर्षभरात झालेली ही सर्व सेवा श्रीगुरुचरणीं समर्पित करतो !
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

Read More

20 June 2017

*॥ अमृतबोध ॥* *२० जून २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १८४ ॥*

श्रीभगवंतांचे नाम सुलभ असूनही सर्वत्र दुर्लभ होऊन बसलेले आहे, असे सद्गुरु श्री माउली म्हणतात. याचे आणखी एक कारण सांगताना प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात, "नाम जरी आपल्याला माहीत असले, तरी ते उच्चारायचे कसे? हेही माहीत असावे लागते. ते योग्य उच्चारणच कष्टाचे ठरत असल्यामुळेही नाम दुर्लभ झालेले आहे. कारण त्यासाठीही पूर्वपुण्याईच पाहिजे. त्या नामाचे जसे व्हायला पाहिजे तसेच साधन घडण्यासाठी आपल्या गाठीशी पूर्वपुण्याईच लागते. हे सर्व झाल्यावरच मग माउली म्हणतात तसा, ते नाम सुलभ असल्याचा अनुभव येतो !"
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

Read More

19 June 2017

*॥ अमृतबोध ॥* *१९ जून २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १८३ ॥*

सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज हरिपाठाच्या आठव्या अभंगाच्या शेवटच्या चरणात फार महत्त्वाचा संदर्भ सांगताना म्हणतात, *"ज्ञानदेव म्हणे नाम हें सुलभ । सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे ॥हरि.८.६॥"*
या चरणाचा गर्भितार्थ सांगताना प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात, "सद्गुरु श्री माउली सांगतात की, नाम हे अतिसुलभ आहे. असे असताना संतमहात्मे का म्हणतात की, *"अमृताहूनि गोड नाम तुझें देवा । मन माझें केशवा कां बा नेघे ॥स.सं.ना.१४८४.१॥"* श्रीभगवंतांचे नाम अमृताहून गोड असून, माझ्या मुखी का येत नाही? याचाच खुलासा सद्गुरु श्री माउली शेवटच्या कडव्याच्या उत्तरार्धात करतात. *"सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे ॥"* कारण नाम हे जरी सुलभ असले, तरी ते सर्वत्र दुर्लभ होऊन बसलेले आहे. याला कारण, ते जो जाणतो तो विरळा आहे आणि असा विरळा असलेला आपल्याला मिळाल्याशिवाय, ते आपल्याला कळणार नाही !
असे ते नाम यथार्थपणे जाणणारे परंपरेने आलेले सद्गुरु आपल्याला भेटल्याशिवाय व त्यांची कृपा झाल्याशिवाय ते नाम आपल्याला समग्रपणे कळतच नाही. म्हणूनच माउली त्या दिव्यनामाला 'सर्वत्र दुर्लभ' असे म्हणतात.
नाम दुर्लभ असण्याचे आणखीही एक कारण प.पू.श्री.मामा सांगतात, ते आपण उद्या पाहू.
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

Read More

18 June 2017

*॥ अमृतबोध ॥* *१८ जून २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १८२ ॥*

प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज सांगतात, "रणांगणावर अर्जुनाला भगवान श्रीकृष्णांनी, *'माम् अनुस्मर युध्य च ।'* असा उपदेश केला; तीच *'श्रीमद् भगवद्गीता'* झाली व सख्या उद्धवाला, 'माझे स्मरण करून गृहस्थाश्रम कसा नीट करावा?' ते सांगितले; तेच *'श्रीमद् भागवत'* झाले."
भगवान श्रीकृष्णांनी अर्जुन व उद्धव या दोघांनाच केवळ प्रत्यक्ष कृपानुग्रह केलेला होता. हे दोघेही श्रीभगवंतांचे अतिशय लाडके सखे होते, लीलासहचरच होते. म्हणूनच हरिपाठाच्या आठव्या अभंगात सद्गुरु श्री माउली म्हणतात, *"उद्धवा लाधला कृष्णदाता ॥हरि.८.५॥"*
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

Read More

17 June 2017

*॥ अमृतबोध ॥* *१७ जून २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १८१ ॥*

प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज भक्तराज प्रल्हादांची गोष्ट पुढे सांगतात की, कयाधु ही हिरण्यकश्यपूची नावडती राणी असल्याने ती अरण्यात वास करून होती. त्यावेळी तिने प्रभूंचा धावा केला. तेव्हा देवर्षी नारदमुनींनी येऊन तिला शक्तियुक्त नाम दिले व ज्ञान सांगितले. ते सर्व गर्भात असलेल्या प्रल्हादाने ऐकले व तो जन्मत:च अमर झाला.
मोठा झाल्यावर प्रल्हाद आपले ऐकत नाही, सतत आपल्या शत्रूचे म्हणजेच भगवान श्रीनारायणांचेच
स्मरण करतो, म्हणून त्याच्या बापाने त्याला विष दिले, कड्यावरून लोटले, समुद्रात बुडवले, व्याघ्राच्या तोंडी दिले, मारेकरी घातले. इतके प्रयत्न केले तरी प्रल्हाद काही मरेना.
तेव्हा हिरण्यकश्यपूने विचारले, तुला कोणी वाचवले? त्यावर प्रल्हाद म्हणाला की, माझ्या नारायणाने वाचवले. हा नारायण कोठे राहतो? प्रल्हाद म्हणाला, तो सर्वत्र, जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी राहतो. हिरण्यकश्यपूने चिडून विचारले, या खांबात राहतो का? प्रल्हाद म्हणाला, हो, राहतो.
हे ऐकताच चवताळलेल्या दैत्याने खांबावर धावून जाऊन लाथ मारली. इकडे प्रल्हाद आपला शांतपणे 'नारायण नारायण' जप करीत होताच. खांबावर लाथ मारताच त्यातून सत्वर नृसिंहरूप घेऊन नारायण आले व त्यांनी दैत्यास ठार केले.
या सगळ्यात *'सत्वर उच्चार' याचा अर्थ, घाईने नाम घेणे असा नसून, "अखंड नाम जो शांत चित्ताने घेतो त्याच्या कार्यासाठी देव सत्वर धाव घेतात'*, असाच आहे. हेच सद्गुरु श्री माउली *"सत्वर उच्चार प्रल्हादीं बिंबला ।(हरि.८.५)"* या चरणातून स्पष्ट सांगतात.
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

Read More

16 June 2017

॥ अमृतबोध ॥ १६ जून २०१७

॥ अमृतबोध ॥
१६ जून २०१७
॥ हरिपाठ मंजिरी - १८० ॥
हरिपाठाच्या आठव्या अभंगातील पाचव्या चरणात सद्गुरु श्री माउली पुराणातील महत्त्वाच्या कथेचा उल्लेख करताना म्हणतात, "सत्वर उच्चार प्रल्हादीं बिंबला ।(हरि.८.५)"
याच्या स्पष्टीकरणासाठी प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांच्या मातु:श्री पू.पार्वतीदेवी पुराणातील एक कथा सांगत असत.
एकदा सनत्कुमार भगवान विष्णूंकडे जावयास निघाले. तेथे सातव्या कक्षेतील देवांच्या द्वारावर जय-विजय नावाचे द्वारपाल होते. त्यांनी सनत्कुमारांना न ओळखल्याने, दारावरच अडवले. त्यावर त्यांनी जय-विजयांना शाप दिला, "राक्षस होऊन मृत्युलोकी जाल !"
हे वृत्त श्रीभगवंतांना कळताच, ते तेथे आले व त्यांनी स्वत:च त्या शापास उ:शाप सांगितला. सनत्कुमारही दयावंतच होते. त्यांनी त्या द्वारपालांना सांगितले की, "तुझ्या पोटी भक्त जन्माला येईल व त्या भक्ताचा तू छळ करशील. त्यास वाचविण्यास देव येतील व त्या भक्ताचे रक्षण व तुझे मरण एकाचवेळी घडेल. देवांनी मारले म्हणून मग तुम्ही या जन्मातून मुक्त व्हाल !"
हेच जय-विजय हिरण्याक्ष व हिरण्यकश्यपू असे राक्षस होऊन पृथ्वीतलावर जन्माला आले. हिरण्यकश्यपूच्या कयाधु नावाच्या नावडत्या राणीच्या पोटी प्रल्हाद हा भक्तगर्भ राहिला. त्याच प्रल्हादांचा उल्लेख माउली याठिकाणी करतात. माउलींच्या त्या 'सत्वर उच्चार' शब्दाचा पू.मामांनी सांगितलेला गूढार्थ आपण उद्या पाहू
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
Read More

15 June 2017

*॥ अमृतबोध ॥* *१५ जून २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १७९ ॥*

हरिपाठाच्या आठव्या अभंगातील चवथ्या चरणाच्या उत्तरार्धात सद्गुरु श्री माउली योग्यांचे वर्णन करताना म्हणतात, *"योगियां साधिली जीवनकळा ॥हरि.८.४॥"*
याचे विवरण करताना प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात, येथे योगी याचा अर्थ 'हठयोगी' असा घेण्याचे काहीच कारण नाही. योगी म्हणजे जो परमात्म्याशी जोडलेला आहे, एकरूप झालेला आहे तो. मुळात जीवात्मा परमात्म्यापासून कधीच अलग होऊ शकत नाही. माउली सांगतात की, जसा सूर्याचा किरण सूर्याला सोडून राहूच शकत नाही; तसा परमात्म्याचा अंश जो जीवात्मा, तो त्यास सोडून राहू शकत नाही.
या चरणात एक मोठा गंमतीदार शब्द आला आहे, "साधिती साधन". म्हणजे साधना करता करता साधती. परंतु ती अखंड झाली की मगच त्याला 'साधली' असे म्हणतात. हा शब्द माउलींनी अखंडपणाकरिता मुद्दामच घातलेला आहे. कारण एकदा का ही कला साधली, की त्याचे पुढील जीवन मुक्त होते. म्हणूनच त्या योग्याला 'जीवन्मुक्त' म्हणतात.
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

Read More

14 June 2017

*॥ अमृतबोध ॥* *१४ जून २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १७८ ॥*

सद्गुरु श्री माउली हरिपाठाच्या आठव्या अभंगातील चवथ्या चरणात म्हणतात, *'नामामृत गोडी वैष्णवां लाधली ।(हरि.८.४)'* वैष्णवांना नामरूपी अमृताची गोडी प्राप्त झाली.
याचे विवरण करताना प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात, नाम हेच अमृत आहे; का नाम घेता घेता श्रीगुरु भेटले व त्यांनी साधन सांगितले; ते साधन करता करता अमृताचा अनुभव आला? यावर विचार करायला हवा.
कारण, मुखाने जरी नाम घेतले, पण मनात दुसरेच विचार असले तर काय उपयोग? 'मुख में रामनाम, बगल में छुरी ।' अशी म्हणच आहे ना. म्हणजेच नुसते नाम काम करीत नसून, ज्याला श्रीगुरुकृपेने त्या नामाचे साधन मिळालेले आहे, त्यालाच त्या नामामृताची गोडी चाखावयास मिळते. अशी गोडी जो चाखतो त्यालाच वैष्णव म्हणतात.
श्रीसंत तुकाराम महाराज म्हणतात की, *'विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म ।(तु.गा.२१.१)'* सर्वत्र देवाशिवाय काहीच नाही, हे जाणून जो वागतो, तोच खरा भक्त व असे वागणे हाच वैष्णवाचा धर्म होय ! म्हणूनच मी निराळा व देव निराळा असे मानणा-याला माउली 'करंटा' म्हणतात.
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

Read More

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Blog Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates