साधकाची साधना ही अनेक गोष्टींवर अवलंबून असते. श्रीगुरूंची कृपा ही सर्वात महत्त्वाची गोष्ट असली, तरी अजूनही काही गोष्टी असतात. त्यातील एक महत्त्वाचा मुद्दा सांगताना प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात, " साधना ही पूर्वजन्मातल्या तयारीप्रमाणेच, कर्मांप्रमाणेच होत असते. म्हणूनच ती सोडूनही चालणार नाही. "
आपला पूर्वजन्मी जो काही साधनाभ्यास झालेला आहे, त्यानुसारच या जन्मी साधना घडते. पूर्वीच्या पुण्याने किंवा कर्माने साधना जेथवर आलेली असेल, तेथूनच पुढे या जन्मी श्रीगुरुकृपा होऊन साधना सुरू होत असते.
यासाठी पू. मामा फार सुंदर उदाहरण देतात. कापूर, शेणाची गोवरी व ओल्या शेणाचा गोळा या तीन पदार्थांचे ज्वलन कसे होते पाहा. कापूर काडी लागल्याबरोबर पेटतो. गोवरी थोडी धुमसून मग पेटते. तर शेणाचा गोळा आधी वाळावा लागतो, मग तो पेट घेतो. तसे, ज्याचे जेवढे साधन पूर्वी झालेले आहे, त्याला या जन्मी त्यानुसार लवकर किंवा उशीरा अनुभूती येते. पण पूर्वीचे गाठीशी आहे म्हणून या जन्मी साधनेचा कंटाळा करून चालत नाही. ती करावीच लागते. पू. मामा आवर्जून सांगत असत, " देहाची तीन चिमट्या राख होईपर्यंत साधना झालीच पाहिजे ! " त्यांनी स्वत: देखील हे सांगणे शेवटच्या क्षणपर्यंत पाळून आपल्यासमोर मोठा आदर्श घालून दिलेला आहे.
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
24 November 2016
॥ अमृतबोध ॥ २४ नोव्हेंबर २०१६
Subscribe to:
Post Comments (Atom)
Total Pageviews
Translate
Followers
Popular Posts
-
शुभ दीपावली !! श्रीसंत तुकाराम महाराज म्हणतात, " जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी । तेणे पथ्ये सांभाळावी ॥ " या 'विठ्ठल मात्रे...
-
॥ अमृतबोध ॥ संतांचे ' सांगणे ' फार मार्मिक असते. परिस्थितीचा पुरेपूर अंदाज त्यांच्या क्रांतदर्शी विचारांनी आधीच घेतलेला असतो. ...
-
नमस्कार मित्रहो, संतांची वचने ही दीपस्तंभासारखी असतात. महासागरात वाट चुकून भलतीकडे जाणा-या जहाजांना योग्य दिशा व योग्य मार्गावर ठेवण्य...
-
( श्रीदत्तसंप्रदायाचे अध्वर्यू योगिराज सद्गुरु श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांच्या २६ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त विशेष लेखमाला...
-
प. पू . सद्गुरु श्री. मामासाहेब देशपांडे महाराज यांच्या पुस्तकांसाठी - श्रीवामनराज प्रकाशन पुणे . ' श्रीगुरुकृपा ' , श्रीसंत ...
-
( श्रीदत्तसंप्रदायाचे अध्वर्यू योगिराज सद्गुरु श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांच्या २६ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त विशेष लेखमाला. ...
-
॥ अमृतबोध ॥ योगिराज सद्गुरु श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांच्या नित्य-चिंतनीय अशा ' अमृतबोध ' ग्रंथामधील प्रस्तुत उपदेश-वचन...
Blog Archive
-
▼
2016
(210)
-
▼
November
(30)
- ॥ अमृतबोध ॥ ३० नोव्हेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ २९ नोव्हेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ २८ नोव्हेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥२७ नोव्हेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥२६ नोव्हेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥२५ नोव्हेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ २४ नोव्हेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥२३ नोव्हेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ २२ नोव्हेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ २१ नोव्हेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥२० नोव्हेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ १९ नोव्हेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ १८ नोव्हेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥१७ नोव्हेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ १६ नोव्हेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥१५ नोव्हेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ १४ नोव्हेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ १३ नोव्हेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ १२ नोव्हेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ११ नोव्हेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥१० नोव्हेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ९ नोव्हेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ८ नोव्हेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ७ नोव्हेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ६ नोव्हेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ५ नोव्हेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ४ नोव्हेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ३ नोव्हेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ २ नोव्हेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ १ नोव्हेंबर २०१६
-
▼
November
(30)
0 comments:
Post a Comment