17 November 2016

॥ अमृतबोध ॥१७ नोव्हेंबर २०१६

सामान्यपणे ज्याला ऐकू येत नाही त्याला बहिरा म्हणतात. पण कानांच्या अकार्यक्षमतेपुरतेच हे बहिरेपण संतांना मात्र मान्य नाही. म्हणूनच संतांना अभिप्रेत असलेले व परमार्थाच्या दृष्टीने पाहिल्यावर जाणवणारे खरे बहिरेपण सांगताना प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात, " श्रीभगवंतांविषयी काहीही ऐकले की, या कानातून घेऊन त्या कानाने जे सोडून देतात, पण प्रपंचाविषयी गोष्ट आली की मात्र पक्की लक्षात ठेवतात, त्यांनाच संत ' बहिरे ' म्हणतात. "
प्रपंचाची तीव्र आवड व परमार्थाविषयी अनास्था असणा-या बद्ध जीवांचे सगळे वागणे, प. पू. श्री. मामा सांगतात त्या बहिरेपणामध्येच मोडते. लहान मूल जसे जेवायला खायला, शिस्तीने वागायला कंटाळा करते; पण खेळायला मात्र केव्हाही एका पायावर तयार असते. तसेच या बहि-यांचेही असते. कोणी परमार्थाचे काही सांगितले तर त्याकडे साफ दुर्लक्ष करतात, पण प्रपंचाची कोणतीही गोष्ट पक्की लक्षात ठेवतात, कितीही कष्ट पडले तरी जिवाच्या आकांताने धडपडून ती पूर्ण करतात.
अशाच बहि-या लोकांची कीव येऊन दयाळू संत त्यांना सतत बोधामृत पाजून पाजून त्यांचे ते अयोग्य बहिरेपण नष्ट करीत असतात. संतांच्या त्याच जगावेगळ्या तळमळीचे साकार रूप म्हणजेच प. पू. श्री. मामांचा हा ' अमृतबोध ' उपक्रम होय !!
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:

Post a Comment

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Blog Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates