भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज सांगतात की, काचेच्या बरणीत ठेवलेल्या दिव्याचा प्रकाश जसा बाहेर पसरतो, तसे जे अंतरात वसते तेच बाहेर फाकते. आपल्या मनाचे प्रतिबिंब आपल्या वर्तनात दिसून येत असते. आत एक बाहेर एक, हा सर्वच मनुष्यांचा स्वभाव जरी असला, तरीही आपल्या मनातील गोष्टींचे काही ना काही भाग आपल्या वागण्यात दिसतातच.
जे आत तेच बाहेर, हा मात्र संतांचा स्थायीभाव असतो. त्यांचे वैशिष्ट्य सांगताना प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात, " संतांच्या हृदयात जे असते तेच त्यांच्या मुखातून बाहेर पडते ; मग ते भगवंतांशिवाय आणि सद्गुरूंशिवाय बोलणार तरी काय?
संतांच्या हृदयात त्यांचे आराध्य दैवत असणारे श्रीभगवंत आणि त्यांच्याहून भिन्न नसणारे श्रीसद्गुरूच नित्य विराजमान असतात. म्हणून मग त्यांच्या बोलण्यातूनही त्या परमप्रिय आराध्यांशिवाय दुसरे येणार तरी काय? म्हणून संत सतत त्यांच्याविषयीच बोलतात.
प. पू. श्री. मामा येथे तुम्हां आम्हां साधकांना निज-कर्तव्याचा बोधच करून देत आहेत !
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:
Post a Comment