अगदी सोप्या, घरगुती उदाहरणांमधून परमार्थाचा उत्तम बोध करण्याची विलक्षण हातोटी ही प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांची खासियत होती. त्यामुळेच त्यांच्या उपदेशाने आपल्या हृदयाचा ठाव घेतला नाही तरच नवल !
पूर्वी विहिरीवर रहाट असायचे. त्याला कळशी लावून पाणी शेंदत असत. त्याचे साधनेच्या संदर्भातील फार सुंदर रूपक पू. मामा प्रवचनात सांगत असत. आजपासून पाच दिवस आपण पू. मामांच्या त्या रूपकाचा विचार करणार आहोत.
रहाटाला लावलेल्या दोराला खाली कळशी असते. ती विहिरीच्या पाण्यात सोडून पूर्ण भरून जड झाली की वर खेचून घेतात. साधनेचे मर्मही तसेच असते हे सांगताना पू. मामा म्हणतात, " आपण अनेक जन्म कमवलेल्या विषयांचे ओझे आपल्याला खाली खाली ओढते. पण आपण बळ देऊन नेटाने साधना-अभ्यास करावयाचा असतो ! "
पाण्याने भरलेली कळशी इतकी जड होते की वर उभे राहून ती खेचणा-यालाच खाली ओढते. अशावेळी आपण पायाने नेट लावून, बळ देऊन ती वर ओढावी लागते. तसे आपणच मागील अनेक जन्मांमध्ये कमवलेल्या विषयवासनांचे ओझे आपल्याला सतत खाली खेचत असते. अशावेळी नेटाने धीर धरून व बलपूर्वक साधना-अभ्यास आपण करावयाचा असतो. जेवढा आपला हा निर्धार व नेट अधिक तेवढीच आपली साधनाही जोमाने होत जाते.
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:
Post a Comment