श्रीभगवंत अपरंपार दयाळू आहेत यात शंकाच नाही. त्यांच्या अहेतुकदयेला ना अंत ना पार. पण ते दया कोणावर करतात? हे देखील आपण पाहिले पाहिजे.
या प्रश्नाचे नेमके व परखड तरीही अतिशय सुंदर उत्तर देताना प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात, " श्रीहरी दयाळू आहेत; पण जो नुसता वाचाळ, बोलघेवडा आहे त्याला ते पावत नाहीत. सद्गुरूंनी कृपा केल्यावर त्याने अभ्यासही केला पाहिजे. "
' असेल हरी तर देईल खाटल्यावरी ', हे ते चुकूनही करत नाहीत. जो नुसत्या गप्पा मारतो व केवळ बोलघेवडा आहे, पण स्वत: प्रयत्न करत नाही की कष्ट करत नाही, त्याला श्रीभगवंत कधीच पावत नाहीत. श्रीसद्गुरूंनी कृपापूर्वक साधना दिली म्हणजे सगळे झाले, असे मानणे हा वेडेपणाच आहे. श्रीगुरुकृपा झाल्यानंतर जर झटून साधना घडली नाही; तर मग काय उपयोग? मात्र जो प्रेमाने व नेमाने साधना करतो, त्याचा श्रीभगवंत आणि श्रीसद्गुरु सर्व बाजूंनी प्रतिपाळ करतात व त्याच्या परमार्थाबरोबरच आवश्यक तेवढा संसारही सांभाळून त्याला समाधान देतात ! म्हणूनच प. पू. श्री. मामांचे सांगणे फार महत्त्वाचे आहे.
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:
Post a Comment