॥ अमृतबोध ॥
२९ नोव्हेंबर २०१६
सत्य एक असताना दुसरे खोटेच काहीतरी सत्य म्हणून समोर ठेवणे म्हणजे दंभ होय. हा अनेक प्रकारांनी आपल्या सतत समोर येतच असतो. कधी कधी आपणही दंभाने वागतो तर कधी समोरचा वागत असतो.
या दंभाचा एक आयाम सांगताना प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात, " दंभ या दोषाने अनेकांचे वाटोळे केलेले आहे. दंभी मनुष्य परमार्थाकरिता 'कुपात्र' ठरतो. "
" मला हे माहीत आहे, मला विचारा मी सांगतो ", असे जो म्हणतो त्याला दंभ असतो, हे पक्के समजावे. तो नक्की फसवणार; असेही पू. मामा सांगून ठेवतात. आपण साधक म्हणून चुकूनही या दंभाच्या नादी लागता कामा नये. आपल्या मनात असा कोणताही दंभ येऊ नये, म्हणून खूप काळजीपूर्वक श्रीगुरूंच्या चरणीं शरण जाऊन साधना करीत राहिले पाहिजे. कारण हा दंभ आला की, पू. मामांच्या या अमृतबोधानुसार, आपण साधनेसाठी कुपात्र ठरू.
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:
Post a Comment