पापकर्म तीन प्रकारचे असते, असे प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज सांगतात. काल आपण पाहिलेले त्यातील पहिले, मानसिक पाप हे कलियुगात गौण मानले जाते.
मनातील हीच पापवृत्ती प्रारब्धाने व आपल्या दुर्विचाराने बळावली की तीच त्या मनुष्याच्या मुखावाटे बाहेर पडते. म्हणून प. पू. श्री. मामा सांगतात, " अंत:करणात झालेल्या पापाच्या निश्चयाचा मनुष्य उच्चार करून दाखवतो, हे दुसरे पापकर्म. "
मानसिक पाप जेव्हा वाचिक स्तरावर येते तेव्हा मात्र त्याचे दुष्परिणाम हे भोगावेच लागतात. म्हणून कारण नसताना कोणाची साधी निंदा जरी केली तरी त्याचे पाप हे लागतेच. श्रीभगवंतांनी प्रसाद म्हणून आपल्याला दिलेली वाणी त्यांचे नाम-गुणवर्णन, संतांची स्तुती, सद्ग्रंथांची पारायणे यासारख्या सात्त्विक गोष्टींतच जर आपण रंगवली नाही, तर ती वाणी पापमूलकच ठरते. म्हणून संत म्हणतात की, " जिभले तुजला काय गे धंदा । घडीभर भज गे गोविंदा ॥ " वाचिक पाप फार घडू नये, यासाठीच मौनासारख्या वाणी-संयमाला साधकीय जीवनात महत्त्व दिलेले दिसून येते.
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:
Post a Comment