ज्ञान आणि माहिती यात खूप गल्लत केली जाते. संतांना अभिप्रेत असणारे ज्ञान म्हणजे आत्मज्ञानच, आपल्या स्वरूपाचे ज्ञान. आणि आपल्याला शाळा, जुने जाणते लोक, सोशल मिडिया इत्यादी एकूणएक स्तरांवरून मिळणारे ज्ञान हे ज्ञान नसून ती माहिती आहे. ज्ञान हे शिकवून किंवा बाहेरून कधीच येत नसते, ते आतूनच स्वयंभ प्रकट होत असते !
ज्ञान हा परब्रह्माचा विशेष गुण असून, प्रत्येक जीवाचेही तेच मूळचे स्वरूप आहे. परब्रह्मावर वासनांचे आवरण आले की त्यालाच ' जीव ' असे म्हणतात. म्हणून त्या वासनांची शुद्धी झाल्याशिवाय मूळचे ज्ञान कधीच प्रकट होत नाही; आणि वासनांची शुद्धी होण्यासाठी साधना हाच एकमात्र मार्ग आहे. साधनेचे महत्त्व यथार्थपणे सांगताना प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात, " पूर्ण ज्ञान हे वासनाशुद्धीशिवाय होत नाही. म्हणून त्यासाठी साधनेची आवश्यकता आहे ! "
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:
Post a Comment