॥ अमृतबोध ॥
३० नोव्हेंबर २०१६
साधना सातत्याने जो करतो तोच साधक होय. साधना नुसती मिळून चालत नाही, त्याची पण काही आवश्यक अंगे असतात, ती नीट पाळली गेली तरच साधना पूर्णत्वास जाते. याविषयी फारच सुंदर शब्दांमध्ये मार्गदर्शन करताना प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात, " नुसते नोकरी लागून चालत नाही; तर तेथे वेळच्या वेळी हजर होणे, काम चोख करणे, त्यात प्रामाणिकपणा असणे हेही आवश्यक असते. साधना करताना देखील या सर्व गोष्टी अंतर्बाह्य आवश्यक असतात. "
साधनेसाठी लौकिकातले नोकरीचे उदाहरण प. पू. मामा देतात. नोकरी नुसती लागून भागत नाही, तर तेथे वेळच्या वेळी जावे लागते, प्रामाणिकपणे व चोख कामही करावे लागते. तसेच साधनाही जशी श्रीगुरूंनी सांगितलेली आहे अगदी तशीच, वेळच्या वेळी व चोखपणे व्हायला हवी.
पू. मामा येथे एक फार महत्त्वाचा शब्द वापरतात. साधनेतला हा चोखपणा ' अंतर्बाह्य ' हवा असे ते आवर्जून सांगतात. म्हणजे आपली साधना लोकांना दाखविण्यापुरती, केवळ दांभिकपणे व्हायला नको. त्यातला प्रामाणिकपणा हा अात बाहेर एकच हवा. कारण अनुग्रहाच्या रूपाने आपले श्रीसद्गुरु आपल्या हृदयातच विराजमान झालेले असतात. आपण त्यांना तर कधीच फसवू शकत नाही, ते आपले श्वास न् श्वास जाणतात. म्हणूनच पू. मामा म्हणतात तसा साधनेचा प्रामाणिकपणा, चोखपणा अंतर्बाह्य हवा म्हणजे मग साधनेतून खरा आनंद अपरंपार लाभतो !
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:
Post a Comment