सुख आणि दु:ख या व्यक्तिसापेक्ष जाणिवा आहेत. प्रत्येकाचे सुख-दु:ख भिन्न असते. पण प्रत्येक जीवाला त्यांची जाणीव मात्र एकाच गोष्टीमुळे होत असते. ते म्हणजे आपला अहंकार किंवा 'मी'पणा. या संदर्भात आपल्या नेहमीच्या अनुभवाचे उदाहरण घेऊन अतिशय सुंदर विवेचन प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांनी केलेले आहे.
प. पू. श्री. मामा म्हणतात, " सुख-दु:खांची जाणीव आपल्या 'मी' मुळे असते. हा 'मी' लोपला की ती जाणीवही लोपते. " हे समजावून सांगताना ते म्हणतात की, एक माणूस होता, त्याचा पाय कापला. तो ओरड ओरड ओरडतोय; पण त्यातच त्याला चुकून झोप लागली. त्यावेळी त्याचे दु:ख तो विसरला. म्हणजे काय झाले? त्या ठिकाणी 'मी' होता त्यावेळी दु:ख वाटत होते, तो मी लोपल्यावर दु:ख वाटेनासे झाले.
'मी' लोपला की आपण शरीराला विसरतो. झोपेत मी लपतो, म्हणून मला माझी जाणीव नसते. एकदा शरीर विसरले की त्या देहाशी संबंधित सर्व काही विसरतात. नवरा-बायको-पोरे एकमेकांना विसरतात, घरदार, इस्टेट सगळे काही विसरले जाते. पुन्हा मी बाहेर आला की सगळे आठवते. कारण, सुख-दु:खांची जाणीव या 'मी' वरच अवलंबून असते.
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:
Post a Comment