संत तुम्हां आम्हां लोकांना अगदी बरोबर ओळखतात. त्यांना पक्के माहीत असते की, आपल्या मनात काय चालू अाहे. त्यातूनच हळू हळू, बाबापुता करून संत आपल्याला परमार्थ शिकवत असतात.
साधकांची मनस्थिती नेमकी ओळखून, प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज सांगतात, " आपली साधना नियमाने, प्रेमाने कशी होत राहील?' अशी साधनेचीच चिंता आपण करावी. मग श्रीभगवंत आपोआप काम करतात. पण आम्ही चिंता करतो, साधना कशी बुडवावी? याची.
श्रीभगवंत दयाळू आहेत, त्यांनाही साधकांच्या परमार्थाची आवड असते. साधकाने प्रेमाने व नेमाने साधना करायची ठरवली, तर ते आपणहून त्याला मदत करतातच. पण आपण त्यांना योग्य प्रकारे मदत मागतच नाही. आपण त्या साधनेचा कंटाळा करण्याचाच प्रयत्न करतो.
काय मागावे? कशाची चिंता करावी? हे पण नीट कळले पाहिजे. यासाठीच प. पू. श्री. मामा आजच्या बोधातून तीच सुयोग्य जाणीव आपल्याला करवून देत आहेत. साधक म्हणून आपल्याला खरी चिंता साधनेचीच असायला हवी; म्हणजे मग बाकी कसल्या चिंता उरणारच नाहीत !
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:
Post a Comment