भगवान श्री ज्ञानेश्वर माउलींच्या हरिपाठाच्या पहिल्याच शब्दाचे, 'देवाचिये द्वारी'चे अनेक अर्थ आजवर लोकांनी केलेले आहेत. पण सर्व आशंकांचे समाधान त्यांपैकी कोणत्याच अर्थाने होत नाही. काहीजण म्हणतात, देवांचे द्वार म्हणजे देवांचे नाम. पण नाम आणि नामी मध्ये भेद नसतो, हा तर सिद्धांत आहे. म्हणून हा अर्थ घेतला, तर देऊळ किंवा देवळाचे द्वार आणि देव हे एकच म्हणावे लागतील. म्हणजे नाम हे देवांचे द्वार, हे काही चपखल बसत नाही. बरे, स्थूल मंदिराचे द्वार हा शब्दश: अर्थ घेतला तरी जमत नाही. कारण देवळाच्या दारात क्षणभर नाही, जन्मभर उभे राहूनही मुक्तीतला 'मु' सुद्धा लाभत नाही. इथे तर, चारही मुक्ती लाभतात, असे माउली छातीठोकपणे सांगतात. मग देवाचे द्वार म्हणजे नक्की काय?
या 'देवाचिये द्वारी'चा विलक्षण सुंदर व स्वानुभूत अर्थ प.पू.श्री. मामासाहेब देशपांडे महाराज सांगतात. अप्रतिम शब्दांमध्ये हे रहस्य सांगताना ते म्हणतात, " भक्ताच्या अंतःकरणातील श्रीभगवंतांविषयीचे निरुपचार प्रेम, हे देवांचे नित्य-वस्तीचे ठिकाण आहे; आणि त्याचे सप्रेम-चिंतन हे त्या ठिकाणी प्रवेश करून घेण्याचे द्वार आहे. "
जो विभक्त नाही तो भक्त. म्हणजे तो श्रीभगवंतांशी सतत जोडलेला आहे. कशाने? तर, निखळ प्रेमाने ! भक्ताच्या चोखट हृदयातील हे निरुपचार, निर्विकार, निरपेक्ष, शुद्ध प्रेमच श्रीभगवंतांचे अखंड वसतीचे स्थान आहे. आणि या प्रेमाच्याच भक्कम आधारावर त्या परमप्रेमास्पद श्रीभगवंतांचे, त्यांच्या प्रेममय स्वरूपाचे, त्यांच्या मधुमधुर प्रेमलीलेचे भक्ताकडून तितक्याच प्रेमाने होणारे अविरत स्मरण हेच त्या प्रेममंदिराचे प्रवेशद्वार आहे !
निखळ प्रेम ही एकच गोष्ट आहे की जी थांग न लागणा-या, अपार अशा भगवंतांनाही सर्व बाजूंनी सहज कवळून घेऊ शकते, गवसणी घालू शकते. स्वत: श्रीभगवंतांनीच हे गीतेत अनेकवेळा सांगितलेले आहे. " जयाचे चित्त गंवसणी । व्यापका मज ॥ " किंवा " तयाचे चोखटे मानसी । मी होऊनि असे गा क्षेत्रसंन्यासी । " किंवा " वांचूनि आमुचियालागीं निष्कळ । भक्तितत्त्व ॥ " यांसारखी असंख्य प्रमाणे देता येतील. असे निरुपचार प्रेम असेल, तर स्वत: श्रीभगवंतच जेथे 'श्रीखंड्या' बनून भक्ताघरी पाणी भरतात किंवा 'उदना' बनून पडेल ती सेवा करतात, तेथे चारी मुक्तींची काय कथा? त्या मुक्ती तर दासी होऊन अशा थोर भक्तांचे अंगण झाडतात अंगण !!
खरंच सांगतो, 'देवाचिये द्वारी'च्या या सर्वसमावेशक भन्नाट अर्थासाठी, प.पू.श्री.मामांना " Hats off to you " म्हटल्याशिवाय राहवतच नाहीये !!!!
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
21 December 2016
॥ अमृतबोध ॥ २१ डिसेंबर २०१६ ॥ हरिपाठ मंजिरी - ५ ॥
Subscribe to:
Post Comments (Atom)
Total Pageviews
Translate
Followers
Popular Posts
-
शुभ दीपावली !! श्रीसंत तुकाराम महाराज म्हणतात, " जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी । तेणे पथ्ये सांभाळावी ॥ " या 'विठ्ठल मात्रे'...
-
नमस्कार मित्रहो, संतांची वचने ही दीपस्तंभासारखी असतात. महासागरात वाट चुकून भलतीकडे जाणा-या जहाजांना योग्य दिशा व योग्य मार्गावर ठेवण्य...
-
श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्र हे जवळपास गेली साडेपाच हजार वर्षे लाखो भक्तांकडून मनोभावे म्हटले जात आहे. आजवरच्या सर्व भक्तांकडून या स्तोत्र...
-
ग्रंथ हे गुरु असतात, पण मर्यादित अर्थाने. कारण ग्रंथांवरून होणारे ज्ञान जोवर आपल्या अनुभवाला येत नाही तोवर ते ज्ञान अपुरेच असते...
-
साधना 'निष्कामतेने' करायची असते : साधना 'निष्कामतेने' करायची म्हणजे काय ? साधना करण्याचा तात्पुरता ऐहिक असा काहीही फायदा नाह...
-
( श्रीदत्तसंप्रदायाचे अध्वर्यू योगिराज सद्गुरु श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांच्या २६ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त विशेष लेखमाला...
-
( श्रीदत्तसंप्रदायाचे अध्वर्यू योगिराज सद्गुरु श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांच्या २६ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त विशेष लेखमाला. ...
-
भक्ती ही श्रीगुरूंनी कृपापूर्वक प्रदान करावी लागते. श्रीसंत तुकाराम महाराजही सांगतात, " नवविधा काय बोलिली जे भक्ती । ती द्यावी माझे हा...
Blog Archive
-
▼
2016
(210)
-
▼
December
(31)
- ॥ अमृतबोध ॥३१ डिसेंबर २०१६॥ हरिपाठ मंजिरी - १५ ॥
- ॥ अमृतबोध ॥ ३० डिसेंबर २०१६ ॥ हरिपाठ मंजिरी - १४ ॥
- ॥ अमृतबोध ॥ २९ डिसेंबर २०१६ ॥ हरिपाठ मंजिरी - १३ ॥
- ॥ अमृतबोध ॥ २८ डिसेंबर २०१६ ॥ हरिपाठ मंजिरी - १२ ॥
- ॥ अमृतबोध ॥ २७ डिसेंबर २०१६ ॥ हरिपाठ मंजिरी - ११ ॥
- ॥ अमृतबोध ॥ २६ डिसेंबर २०१६ ॥ हरिपाठ मंजिरी - १० ॥
- ॥ अमृतबोध ॥ २५ डिसेंबर २०१६ ॥ हरिपाठ मंजिरी - ९ ॥
- ॥ अमृतबोध ॥ २४ डिसेंबर २०१६ ॥ हरिपाठ मंजिरी - ८ ॥
- ॥ अमृतबोध ॥ २३ डिसेंबर २०१६ ॥ हरिपाठ मंजिरी - ७ ॥
- ॥ अमृतबोध ॥ २२ डिसेंबर २०१६ ॥ हरिपाठ मंजिरी - ६ ॥
- ॥ अमृतबोध ॥ २१ डिसेंबर २०१६ ॥ हरिपाठ मंजिरी - ५ ॥
- ॥ अमृतबोध ॥ २० डिसेंबर २०१६ ॥ हरिपाठ मंजिरी - ४ ॥
- ॥ अमृतबोध ॥ १९ डिसेंबर २०१६ ॥ हरिपाठ मंजिरी - ३ ॥
- ॥ अमृतबोध ॥ १८ डिसेंबर २०१६ ॥ हरिपाठ मंजिरी - २ ॥
- ॥ अमृतबोध ॥ १७ डिसेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ १६ डिसेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥१५ डिसेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ १४ डिसेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥१३ डिसेंबर २०१६भगवान श्रीदत्तात्रेय जयं...
- ॥ अमृतबोध ॥ १२ डिसेंबर २०१६ भगवान श्रीदत्तात्रेय...
- ॥ अमृतबोध ॥ ११ डिसेंबर २०१६ भगवान श्रीदत्तात्रेय...
- ॥ अमृतबोध ॥१० डिसेंबर २०१६ - श्रीगीता जयंती
- ॥ अमृतबोध ॥ ९ डिसेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ८ डिसेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ७ डिसेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ६ डिसेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥५ डिसेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ४ डिसेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ३ डिसेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥२ डिसेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥१ डिसेंबर २०१६
-
▼
December
(31)
0 comments:
Post a Comment