प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांनी श्रीवामनराज त्रैमासिकातून, भगवान श्री माउलींच्या हरिपाठावर सुरेख लेखमाला लिहिली होती. परंतु त्यांना हरिपाठातील अठरा अभंगांवरच लिहिणे शक्य झाले. सर्व अभंगाचे सविस्तर विवरण पूर्ण करण्यास नियतीने त्यांना सवडच कधी मिळू दिली नाही. पण जे उपलब्ध विवरण आहे तेच मुळी इतके अलौकिक आहे की बस! हरिपाठ चिंतनाची पूर्णत: नवीन व अनोखी दिशाच त्यातून आपल्याला लाभते. या एकोणीस लेखांचा *'हरिपाठ मंजिरी'* नावाचा स्वतंत्र ग्रंथही श्रीवामनराज प्रकाशनाने प्रसिद्ध केलेला आहे. सदर ग्रंथ सध्या अनुपलब्ध आहे. म्हणूनच येत्या काही दिवसांमध्ये, 'अमृतबोध' मधून आपण पू.मामांच्या त्या अद्भुत नाममाहात्म्य विवरणाचा विचार करणार आहोत. तुम्हां आम्हां सश्रद्ध उपासक-अभ्यासकांसाठी ही खरोखरीच महाकुंभ पर्वणीच ठरेल, यात शंका नाही ! सर्वांचे मन:पूर्वक स्वागत.
भगवान श्री माउली हरिपाठातून श्रीगुरुकृपेने होणा-या नामसाधनेचा सर्वांगीण ऊहापोह करतात. पू.मामा म्हणत की, हरिपाठ हा माउलींच्या सर्व वाङ्मयाचे सार आहे. म्हणून त्या दृष्टीने पाहिले तर, वरवर वाचताना सोपा वाटणारा हरिपाठ सोपा मुळीच नाही, हे लक्षात येते. पू.मामांचे त्यावरील रहस्योद्घाटक विवरण वाचल्यावर तर हे मनापासून पटतेच.
हरिपाठाच्या साधनेचे एकाच वाक्यात सार सांगताना पू.मामा म्हणतात, " संसार म्हणजे वासना. या वासनेच्या जंजाळातून सुटावयाचे असेल तर, व्यासांनी सांगितलेला ' हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा ।' हाच उपाय आहे ! "
संसार म्हणजे बायका-पोरे नव्हेत. संसार म्हणजे आपणच पूर्वी केलेल्या कर्मांमधून निर्माण झालेल्या आपल्या वासना. या वासनांच्या जंजाळातून सुटायचे असेल तर त्यासाठी केवळ एकच मार्ग आहे. तो म्हणजे, महर्षी वेदव्यासांनी आपल्या पुराणादी समग्र वाङ्मयातून मांडलेला व माउलींनी हरिपाठातून पुरस्कृत केलेला, *' हरिमुखे म्हणा हरि मुखे म्हणा ।'* हाच तो नामजपाचा मार्ग होय. परंपरेने आलेल्या जाणत्या व दावित्या श्रीगुरूंकडून लाभलेल्या, कृपायुक्त नामाच्या अनुसंधानाने होणारा खरा परमार्थ हाच सर्वश्रेष्ठ मार्ग होय. याच मार्गाने गेले असता श्रीहरींची प्राप्ती होते.
या मार्गाची सर्व अंगांनी व सर्वसमावेशक अशी मांडणी श्री माउली आपल्या हरिपाठातून करतात. त्या विलक्षण चिंतनाचे पू.मामांनी केलेले मार्मिक विवरण, त्यांच्याच कृपेने आपण आजपासून रोज क्रमाक्रमाने अभ्यासणार आहोत !
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
17 December 2016
॥ अमृतबोध ॥ १७ डिसेंबर २०१६
Subscribe to:
Post Comments (Atom)
Total Pageviews
Translate
Followers
Popular Posts
-
शुभ दीपावली !! श्रीसंत तुकाराम महाराज म्हणतात, " जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी । तेणे पथ्ये सांभाळावी ॥ " या 'विठ्ठल मात्रे'...
-
नमस्कार मित्रहो, संतांची वचने ही दीपस्तंभासारखी असतात. महासागरात वाट चुकून भलतीकडे जाणा-या जहाजांना योग्य दिशा व योग्य मार्गावर ठेवण्य...
-
श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्र हे जवळपास गेली साडेपाच हजार वर्षे लाखो भक्तांकडून मनोभावे म्हटले जात आहे. आजवरच्या सर्व भक्तांकडून या स्तोत्र...
-
ग्रंथ हे गुरु असतात, पण मर्यादित अर्थाने. कारण ग्रंथांवरून होणारे ज्ञान जोवर आपल्या अनुभवाला येत नाही तोवर ते ज्ञान अपुरेच असते...
-
साधना 'निष्कामतेने' करायची असते : साधना 'निष्कामतेने' करायची म्हणजे काय ? साधना करण्याचा तात्पुरता ऐहिक असा काहीही फायदा नाह...
-
( श्रीदत्तसंप्रदायाचे अध्वर्यू योगिराज सद्गुरु श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांच्या २६ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त विशेष लेखमाला...
-
( श्रीदत्तसंप्रदायाचे अध्वर्यू योगिराज सद्गुरु श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांच्या २६ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त विशेष लेखमाला. ...
-
भक्ती ही श्रीगुरूंनी कृपापूर्वक प्रदान करावी लागते. श्रीसंत तुकाराम महाराजही सांगतात, " नवविधा काय बोलिली जे भक्ती । ती द्यावी माझे हा...
Blog Archive
-
▼
2016
(210)
-
▼
December
(31)
- ॥ अमृतबोध ॥३१ डिसेंबर २०१६॥ हरिपाठ मंजिरी - १५ ॥
- ॥ अमृतबोध ॥ ३० डिसेंबर २०१६ ॥ हरिपाठ मंजिरी - १४ ॥
- ॥ अमृतबोध ॥ २९ डिसेंबर २०१६ ॥ हरिपाठ मंजिरी - १३ ॥
- ॥ अमृतबोध ॥ २८ डिसेंबर २०१६ ॥ हरिपाठ मंजिरी - १२ ॥
- ॥ अमृतबोध ॥ २७ डिसेंबर २०१६ ॥ हरिपाठ मंजिरी - ११ ॥
- ॥ अमृतबोध ॥ २६ डिसेंबर २०१६ ॥ हरिपाठ मंजिरी - १० ॥
- ॥ अमृतबोध ॥ २५ डिसेंबर २०१६ ॥ हरिपाठ मंजिरी - ९ ॥
- ॥ अमृतबोध ॥ २४ डिसेंबर २०१६ ॥ हरिपाठ मंजिरी - ८ ॥
- ॥ अमृतबोध ॥ २३ डिसेंबर २०१६ ॥ हरिपाठ मंजिरी - ७ ॥
- ॥ अमृतबोध ॥ २२ डिसेंबर २०१६ ॥ हरिपाठ मंजिरी - ६ ॥
- ॥ अमृतबोध ॥ २१ डिसेंबर २०१६ ॥ हरिपाठ मंजिरी - ५ ॥
- ॥ अमृतबोध ॥ २० डिसेंबर २०१६ ॥ हरिपाठ मंजिरी - ४ ॥
- ॥ अमृतबोध ॥ १९ डिसेंबर २०१६ ॥ हरिपाठ मंजिरी - ३ ॥
- ॥ अमृतबोध ॥ १८ डिसेंबर २०१६ ॥ हरिपाठ मंजिरी - २ ॥
- ॥ अमृतबोध ॥ १७ डिसेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ १६ डिसेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥१५ डिसेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ १४ डिसेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥१३ डिसेंबर २०१६भगवान श्रीदत्तात्रेय जयं...
- ॥ अमृतबोध ॥ १२ डिसेंबर २०१६ भगवान श्रीदत्तात्रेय...
- ॥ अमृतबोध ॥ ११ डिसेंबर २०१६ भगवान श्रीदत्तात्रेय...
- ॥ अमृतबोध ॥१० डिसेंबर २०१६ - श्रीगीता जयंती
- ॥ अमृतबोध ॥ ९ डिसेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ८ डिसेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ७ डिसेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ६ डिसेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥५ डिसेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ४ डिसेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ३ डिसेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥२ डिसेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥१ डिसेंबर २०१६
-
▼
December
(31)
0 comments:
Post a Comment